- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-ओबीसी महासंघाचे १० वे राष्ट्रीय अधिवेशन येत्या,गुरुवार ७ ऑगस्ट २०२५ रोजी गोवा येथे होणार आहे.डॉ.शामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियम,गोवा युनिव्हर्सिटी जवळ,गोवा येथे होणाऱ्या ओबीसी महासंघाच्या दहाव्या अधिवेशनला
आज,सोमवार ४ ऑगस्ट रोजी देसाईगंज ओबीसी समाज संघटनेचे तालुक्यातील पदाधिकारी तथा कार्यकर्ते मोठ्या संख्येने रवाना झाले आहेत.
या प्रसंगी ओबीसी समाज संघटना तालुका देसाईगंजचे अध्यक्ष लोकमान्य बर्डे यांच्या हस्ते चक्रधर पारधी,राजेंद्र बुल्ले,विलास ठाकरे,ज्ञानेश्वर कवासे,महेश पिलारे,नितीन राऊत गजानन सेलोटे, अरुण कुंभलवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हिरवी झेंदी दाखवून कार्यकर्त्यांच्या संचाला शुभेच्छा देण्यात आल्या.सदर अधिवेशनात ओबीसी समाजाचे हक्क, अधिकार,राजकीय सहभाग,आरक्षण आणि संघटनात्मक बळकटीकरण या मुद्द्यांवर विचारमंथन होणार असून देसाईगंज तालुक्यातून मोठ्या प्रमाणात प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.
- Advertisement -

