Saturday, April 18, 2026
Homeनागपूरयेत्या शुक्रवारी मुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री देवेंद्र फडणवीस सादर करणार...

येत्या शुक्रवारी मुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री देवेंद्र फडणवीस सादर करणार राज्याचे अर्थसंकल्प..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-राज्याचे मुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री देवेंद्र फडणवीस हे वर्ष २०२६-२०२७ या आर्थिक वर्षासाठी येत्या,शुक्रवार ६ मार्च रोजी विधानसभेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत.हा अर्थसंकल्प सर्वसामान्यांना समजावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेले “अर्थसंकल्प सोप्या भाषेत” हे पुस्तक उपयुक्त ठरणार असून सर्वांसाठी आज,बुधवार ४ मार्च रोजी संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे.
राज्याच्या आर्थिक प्रगतीचे धोरण असणारा अर्थसंकल्प सर्वसामान्यांना समजावा यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी  “अर्थसंकल्प सोप्या भाषेत” हे पुस्तक लिहिले असून ४ मार्च २०२० मध्ये नागपूर येथील लाखे प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केले आहे.या पुस्तकात ‘बजेट’ शब्दाच्या उत्पत्तीपासून अर्थसंकल्प समजून घेण्यापूर्वी कोणत्या बाजू समजून घ्याव्यात हे सांगितले आहे.अर्थसंकल्प विषयक संज्ञा व त्यासाठी होणारे मराठी व इंग्रजी शब्द प्रयोग,काही महत्वाच्या संकल्पनांचे स्पष्टीकरण, अर्थसंकल्पाविषयी भारतीय संविधानातील तरतुदी, अर्थसंकल्पाची रचना, अर्थसंकल्प तयार होण्याची प्रक्रिया,अर्थसंकल्पीय प्रकाशने,अर्थसंकल्पास मिळणारी मंजुरी या विषयांसह अर्थसंकल्प कसा वाचावा आणि समजून घ्यावा याविषयी सविस्तर विवेचन करण्यात आले आहे.अर्थसंकल्पातील पांढऱ्या रंगाचे मुख पृष्ठ असलेले अर्थसंकल्पीय अंदाज(व्हाईट बुक)हे प्रकाशन आणि यात सापडणारे ग्रीन बुक मधील अर्थसंकल्पीय तरतुदींचे विस्तृत विवरण सोप्या भाषेत समजावून सांगण्यात आले आहे.शासनाच्या विविध विभागनिहाय व विकास मंडळनिहाय अनिवार्य विकास खर्चाची माहिती तसेच राज्यघटनेच्या अनुच्छेद ३७१ (२)(ब) नुसार प्रादेशिक अनुशेष निर्मुलनासाठी राज्यपालांच्या निर्देशानुसार  शासनाने सादर करायचा अनुपालन आदेश.यासह अर्थसंकल्प सादर करणे,मंजूर करणे त्याचे कायद्यात रुपांतर होणे आणि शासनास राज्याच्या एकत्रित निधीतून खर्च करण्यास परवानगी मिळणे आदी टप्पे या पुस्तकात सोप्या भाषेत समजावून सांगितले आहेत.
  • ‘या’ ठिकाणी वाचता येणार पुस्तक👇
अर्थसंकल्प समजून घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेले “अर्थसंकल्प सोप्या भाषेत” हे पुस्तक https://www.devendrafadnavis.in/budget_2020 या संकेतस्थळावर सर्वांसाठी उपलब्ध असून त्यातून अर्थसंकल्प समजून घेण्यास मोठी मदत होणार आहे,असे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या नागपूर संचालक कार्यालयाने प्रसिद्धीस दिले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बालविवाह रोखण्यासाठी प्रशासन ॲक्शन मोडवर.. – ग्रामीण भागात बालविवाह रोखण्याची जबाबदारी ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांवर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर दरवर्षी बालविवाहाच्या घटना घडण्याची शक्यता लक्षात घेता  गडचिरोली जिल्हा प्रशासन व महिला व बालविकास विभाग ॲक्शन मोडवर आले आहे.या...

उष्णतेचा कहर; उद्याला नागपूर जिल्ह्यातील सर्व शाळा आणि शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे आदेश..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-वाढत्या उष्णतेच्या लाटेचा कहर लक्षात घेता नागपूर जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भारतीय हवामान विभागाने उद्या,शनिवार १८ एप्रिल रोजी नागपूर...

खताचा काळाबाजार भोवला; देसाईगंजच्या कृषी केंद्र संचालकावर फौजदारी गुन्हा दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेतकऱ्यांच्या हक्काचे अनुदानित डीएपी खत(DAP)अनधिकृतरीत्या जिल्ह्याबाहेर विकणे,खताचा काळाबाजार करणे तसेच शासकीय ई-पॉस(e-POS) प्रणालीमध्ये फेरफार केल्याप्रकरणी देसाईगंज येथील मे.नाकाडे कृषी केंद्रचे संचालक...

देसाईगंज-आरमोरी काँग्रेस कमिटीची “संघटन सृजन अभियान-पदाधिकारी बैठक” संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या सिंधू भवन येथे आज,शुक्रवार १७ एप्रिल रोजी तालुका काँग्रेस कमिटी देसाईगंज-आरमोरी यांच्या वतीने आयोजित “संघटन सृजन अभियान-पदाधिकारी बैठक” उत्साहात पार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!