Friday, June 19, 2026
Homeभंडारायुवकाच्या गळ्यात नॉयलॉन मांजाचा धागा अडकल्याने गळा कापला.. - प्रचंड रक्तस्राव होऊन...

युवकाच्या गळ्यात नॉयलॉन मांजाचा धागा अडकल्याने गळा कापला.. – प्रचंड रक्तस्राव होऊन उड्डाण पुलावरच पडला..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-जिल्ह्याच्या लाखनी उड्डाण पुलावरून गोरेगावकडे जाणाऱ्या युवकाच्या गळ्यात नॉयलॉन मांजा अडकल्याने गळा कापल्याने प्रचंड रक्तस्राव होऊन उड्डाण पुलावरच पडल्याची घटना मकरसंक्रांतीच्या पूर्वसंध्येला म्हणजेच काल,सोमवारी सायंकाळी ६:३० वाजताच्या दरम्यान घडली.
शुभम जियालाल चौधरी वय २४ वर्षे,गोरेगाव जि. गोंदिया असे गंभीर जखमी युवकाचे नाव आहे.
शुभम हा सायंकाळी आपल्या दुचाकीने भंडाराकडून गोंदियाकडे जात असतांना उड्डाण पुलावर ही दुर्घटना घडली.अज्ञात इसमाची पतंग तुटल्याने उड्डाण पुलावर अडकून पडलेला नायलॉन मांजाचा फास त्याच्या गळ्याला बसला.त्यामुळे रक्तवाहिनी कापली जाऊन प्रचंड रक्तस्राव झाला.यामुळे तो वाहनासह पुलावरच पडला.पुलावरून जाणाऱ्या काही दुचाकीस्वारांच्या लक्षात हा प्रकार आल्यावर नागरिकांनी त्याला लाखनीतील ग्रामीण रुग्णालयात नेले.तिथे वैद्यकीय अधिकारी डॉ.दीपक चिमणे यांनी त्याच्यावर उपचार करून टाके लावले.मात्र,रक्तस्त्राव थांबत नसल्याने त्याला पुढील उपचारासाठी भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात पोहोचविण्याची तयारी केली.दरम्यान,त्याच्या ओळखीतील काही व्यक्ती रुग्णालयात पोहोचले.त्यांनी खासगी वाहनाने शुभमला उपचारासाठी भंडारा शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले.या प्रकरणी लाखनी पोलिसांनी घटनेची नोंद घेतली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नागभीड तालुक्यातील गिरगाव येथे आज,शुक्रवार १९ जून रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.आत्माराम दसरू बोरकर...

कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात येताच नक्षली समर्थक पोलिसांच्या तावडीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-तब्बल अकरा वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा नक्षल समर्थक अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला.विशेष म्हणजे,कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात येताच त्यास अटक करण्यात आली.त्याचा शोध...

देसाईगंजात सुगंधित तंबाखूविक्री जोमात; आरमोरीत अवैध सट्टा-पट्टी,तर कुरखेड्यात दारूचा महापूर..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या विविध तालुक्यात अवैध धंद्यांनी डोके वर काढले असून देसाईगंज शहर व तालुक्यात सुगंधित तंबाखूची खुलेआम विक्री,तर आरमोरी शहरापासून ते ग्रामीण...

जीएसटी नंबर मिळवून दिले नं..! आता दहा हजार द्या.. – राज्यकर निरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-गलेलठ्ठ पगार असतांना एकदा कां ओवर कमाईची सवय लागली रे लागली,तर मग ज्या टेबलावर कुठलेही काम मोफत जरी होत असेल तरी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!