Friday, June 5, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तयंदाच्या हंगामात अल-निनोचा प्रभाव असल्याने पावसात खंड पडण्याची शक्यता..

यंदाच्या हंगामात अल-निनोचा प्रभाव असल्याने पावसात खंड पडण्याची शक्यता..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-खरीप हंगामाच्या पूर्व मशागतीची कामे आटोपल्याने शेतकरी दरवर्षी पेरणीची घाई करतात.पण,यंदाच्या हंगामात अल-निनोचा प्रभाव दिसून येत असल्याने पावसात खंड पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.त्यामुळे पेरणी करतांना शेतकऱ्यांनी जमिनीत पुरेसा ओलावा असल्याशिवाय तसेच जोपर्यंत किमान शंभर मिलिमीटर पाऊस पडत नाही,तोपर्यंत पेरणी करू नये,अशा सूचना कृषी विभागाच्या वतीने देण्यात आल्या आहेत.त्याचबरोबर,बियाणे खरेदी करतांना अधिकृत वितरक किंवा विक्रेते यांच्याकडूनच खरेदी करावे.सोबतच बियाणे खरेदी केल्यानंतर विक्रेत्याकडून पक्क्या बिलाचा आग्रह करावा.पेरणीपूर्वी बियाण्यांची उगवणक्षमता तपासणी करावी.बीजप्रक्रिया केल्याशिवाय पेरणी करू नये,असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.रासायनिक खतांचा पुरेसा साठा असल्यामुळे कोणत्याही अफवेला बळी पडू नये. आवश्यकतेनुसारच खतांची खरेदी करावी.थोड्या प्रमाणात डीएपी खताच्या पुरवठ्यामध्ये अडचणी निर्माण होत आहेत.अशावेळी शेतकऱ्यांनी डीएपी खताच्या एका बॅगला पर्याय असलेल्या खतांचा वापर करावा,असेही आवाहन करण्यात आले आहे.डीएपीच्या पर्यायामध्ये एक बॅग डीएपी,अर्धी बॅग युरिया,तीन बॅग सिंगल सुपर फॉस्फेट किंवा एक बॅग डीएपी,अर्धी बॅग युरिया आणि एक बॅग ट्रिपल सुपर फॉस्फेट(टीएसपी)वापरण्याची शिफारस करण्यात आली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जागतिक पर्यावरण दिन विशेष.. राज्याचे ‘फुफ्फुस’ म्हणून ओळख असलेल्या गडचिरोलीची शाश्वत विकासाकडे वाटचाल..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्रातील सर्वाधिक वनाच्छादित जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोलीने पर्यावरण संरक्षण आणि लोकसहभाग यांचा अद्वितीय संगम साधला आहे.राज्याचे ‘फुफ्फुस’ म्हणून ओळख असलेल्या...

संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात मनाई आदेश लागू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मोहरम उत्सव तसेच माओवादी संघटनेच्या टी.सी.ओ.सी.(TCOC)कालावधीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम,१९५१ च्या कलम ३७...

भरधाव चारचाकी वाहनाची दुचाकीला धडक; तरुणाचा घटनास्थळीच मृत्यू,तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातच नव्हे तर सर्वत्र भीषण अपघाताच्या घटना मोठ्या प्रमाणावर उघडकीस येऊ लागल्या आहेत.आपण आपल्या साईडने जात असो वा कितीही नियंत्रित वाहन...

अन्न व औषध प्रशासन विभागाचा छापा; मोठा औषध साठा जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-कोणत्याही वैज्ञानिक आधाराशिवाय खोटे दावे करणे आणि जाहिरात करून औषध विकणे कायद्यानुसार गंभीर गुन्हा असूनही काहीजण आक्षेपार्ह जाहिराती तसेच निकृष्ट दर्जाची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!