- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-निवडणूक म्हटले की खर्च आलाच.त्यामुळे निवडणूक आयोग खर्चाची मर्यादा निश्चित करतो.यंदा निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीत खर्चाच्या मर्यादेत वाढ केली असून, उमेदवारांना ४० लाख रुपये एवढा खर्च करता येणार आहे.
यापूर्वी ही मर्यादा केवळ २८ लाख इतकी होती.त्यात १२ लाखांनी वाढ करण्यात आली आहे.मात्र, उमेदवारांना खर्चाचा हिशेब द्यावा लागणार आहे. गडचिरोली जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघांत निवडणूक प्रचाराचा धुरळा उडणार आहे.
निवडणूक आयोगाने १५ ऑक्टोंबर रोजी जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार २० नोव्हेंबर रोजी मतदान,तर २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.म्हणजेच नोव्हेंबरच्या सुरुवातीला दिवाळी झाल्यानंतर निवडणुकीचे मैदान मारणाऱ्या उमेदवारांच्या विजयाचे फटाके फुटणार आहेत.
निवडणुकीत पैशांच्या उधळपट्टीला लगाम लावण्यासाठी खर्च मर्यादा निश्चित केली जाते.त्यामुळे निवडणूक विभागाचे उमेदवारांच्या खर्चाकडे विशेष लक्ष राहणार आहे.गेल्या काही वर्षांत प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील लोकसंख्या वाढली आहे.महागाईतही मोठी वाढ झाली आहे.त्यामुळे निवडणूक खर्चाची मर्यादा वाढावी; अशी मागणी विविध पक्षांनी केली होती.त्यामुळे निवडणूक आयोगाने खर्च मर्यादा वाढविल्याची माहिती आहे.
- Advertisement -

