Thursday, September 3, 2026
Homeदेसाईगंजयंदाचा नवरात्रोत्सव नऊऐवजी दहा दिवस... - कोंढाळा येथे नवरात्र महोत्सवाची जय्यत तयारी...

यंदाचा नवरात्रोत्सव नऊऐवजी दहा दिवस… – कोंढाळा येथे नवरात्र महोत्सवाची जय्यत तयारी…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-नवरात्र उत्सवात नऊ दिवस मातेची पूजा,अर्चना करून नवरात्रोत्सव सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. नवरात्रोत्सवाला येत्या गुरुवार दिनांक-३ ऑक्टोंबरपासून प्रारंभ होणार असल्याने या वर्षीच्या नवरात्र महोत्सवाची जिल्ह्यात जय्यत तयारी सुरू झाली आहे.यंदा नऊऐवजी दहा दिवस मातेची पूजाअर्चा होणार आहे.यंदा तृतीय तिथीमध्ये वृद्धी झाली आहे.तसेच नवमीची पूजा आणि विजयादशमी एकाच दिवशी साजरी केली जाणार आहे.गेल्या पाच दिवसांपासून देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा गावातील दत्त मंदिर देवस्थान परिसात मुस्कान दुर्गा उत्सव मंडळ,गावातील मधली गल्ली तसेच नवनगर टोली समाजाच्या वतीने नवरात्र महोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे.गावामध्ये मोठ्या प्रमाणावर नवरात्रोत्सव साजरा करण्यात येत असून यंदा अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून सुरु झालेला नवरात्रोत्सव १२ ऑक्टोंबर पर्यंत असणार आहे. नवरात्रोत्सवात घराघरांत सुख-समृद्धी आणि वैभववृद्धी होऊन रोग पीडाही नाहीशी होण्याची शक्यता असते.तृतीय तिथीमध्ये वृद्धी झाली आहे.या तिथीला पुरातन काळापासून श्रेष्ठ मानले जाते. यावेळी ५ व ६ ऑक्टोबरला तृतीय तिथी आहे. त्यामुळे नवरात्रोत्सवाचा समारोप १२ ऑक्टोबरला होणार आहे.याच दिवशी विजयादशमीही साजरी केली जाणार आहे.तृतीय तिथी ५ ऑक्टोबरला पहाटे साडेपाच वाजता सुरू होऊन ६ ऑक्टोबरला सकाळी साडेसात वाजेपर्यंत असणार आहे.ही तिथी दोन दिवस सूर्योदयाला स्पर्श करणार आहे.त्यामुळे दोन्ही दिवस तृतीय तिथीची पूजा केली जाणार आहे.
कोणतीही नवरात्र ही साधारणपणे नऊ दिवसांची असते,पण तिथीचा क्षय झाल्याने ती आठ दिवसांची किंवा वृद्धी झाल्यास दहा दिवसांची असू शकते. यंदाचा नवरात्रोत्सव दहा दिवसांचा असल्याचे म्हटले जात आहे.३ ऑक्टोबर रोजी अश्विन मासारंभ होत असून, याच दिवशी घटस्थापना केल्यानंतर शारदीय नवरात्रारंभ होत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्या..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य सरकारने आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी तब्बल ११ सनदी अधिकाऱ्यांच्या (आयएएस) बदल्या व नियुक्त्या केल्या आहेत.यात भारतीय प्रशासकीय सेवेतील जिल्हा...

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील जप्त केलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील १८५ गुन्ह्यांच्या नोंदीतुन जप्त करण्यात आलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा आज,गुरुवार ३ सप्टेंबर रोजी...

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!