Friday, September 4, 2026
Homeदेसाईगंजमोहसिनभाई जव्हेरी महाविद्यालयात तीन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न..

मोहसिनभाई जव्हेरी महाविद्यालयात तीन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज मोहसिनभाई जव्हेरी महाविद्यालयात तीन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलन ‘युवा स्पंदन’ मोठ्या उत्साहात नुकतेच  पार पडले असून सदर कार्यक्रमास विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदविला होता.प्रसंगी महाविद्यालयाच्या वतीने विविध मैदानी व इनडोअर खेळांचे आयोजन करण्यात आले.यामध्ये क्रिकेट, कबड्डी यासह विविध क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या.विद्यार्थ्यांनी यात मोठ्या संख्येने भाग घेत
सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले.गायन,एकल नृत्य, गृप नृत्य,फॅशन शो यासारख्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.विद्यार्थ्यांनी उत्तम कला सादर करून उपस्थितांची मने जिंकली.काल बुधवारी सकाळच्या सुमारास प्रश्नमंजूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. त्यानंतर भव्य बक्षीस वितरण सोहळा पार पडला.या वेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यार्थ्यांचा सिंहाचा
वाटा होता.तसेच प्रा.श्रीकांत धोटे,प्रा.सुमेध मेश्राम, प्रा.आशिष डोंगरवार,प्रा.पंकज बोरकर,प्रा.नाकाडे,प्रा. झोया सय्यद,प्रा.हर्षा डोंगरवार,प्रा.डॉ.आशिष सेलोकर,प्रा.डॉ.सुनील चौधरी,प्रा.डॉ.चंद्रकांत शेंडे सह शिक्षकेत्तर कर्मचारी वैशाली ब्रह्मणे नंदकिशोर आतळकर यांचे सहकार्य लाभले.सदरचे कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरून महाविद्यालयाच्या सांस्कृतिक व क्रीडा परंपरेला नवा आयाम मिळाला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देसाईगंज शहरात खळबळ; महिला दारू विक्रेती चार जिल्ह्यांच्या सीमेबाहेर एक वर्षासाठी तडीपार..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यात १९९२ पासून दारूबंदी आहे.तरीही गेल्या काही महिन्यांत लाखो रुपयांचा दारूसाठा व मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून नष्ट केल्याने जिल्ह्यात दारूबंदीचा बुरखा टराटरा...

मोहफुलाची दारू नाही; तर पौष्टिक लाडू,चिक्की व विविध प्रक्रियायुक्त उत्पादने तयार करा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मोहफुलांचा अवैध मद्यनिर्मितीसाठी होणारा वापर रोखून त्यापासून पौष्टिक लाडू,चिक्की व विविध प्रक्रियायुक्त उत्पादने तयार करण्याची सक्षम मूल्यसाखळी जिल्ह्यात उभारावी.महिला बचत गटांना...

आज ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्या..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य सरकारने आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी तब्बल ११ सनदी अधिकाऱ्यांच्या (आयएएस) बदल्या व नियुक्त्या केल्या आहेत.यात भारतीय प्रशासकीय सेवेतील जिल्हा...

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!