Friday, July 17, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तमोठी बातमी.. महानगरपालिकातील महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत 'या' तारखेला..!

मोठी बातमी.. महानगरपालिकातील महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत ‘या’ तारखेला..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील २९ महानगरपालिकांचे गुरुवार १५ जानेवारी रोजी मतदान पार पडले.तर शुक्रवार १६ जानेवारी रोजी मतमोजणी होऊन नगरसेवक निवडीचा मार्ग मोकळा झाला.मात्र, विविध महानगरपालिकेच्या महापौरपदांचे आरक्षण अद्याप जाहीर करण्यात आले नसल्याने कोणत्या प्रवर्गाचा महापौर कोणत्या महानगरपालिकेमध्ये बसणार?अशी उत्कंठा शिगेला पोहोचली होती.अश्यातच आता महापौरपदाच्या आरक्षणाच्या सोडत बाबत मोठी बातमी समोर आली आहे.त्यानुसार,आज,सोमवार १९ जानेवारी रोजी राज्याच्या नगरविकास विभागाकडून एक पत्रक काढण्यात आले आहे.त्यात राज्यातील २९ महानगरपालिकांमधील महापौर पदाचे आरक्षण निश्चितीसाठी आरक्षणाची सोडत राज्यमंत्री(नगर विकास)महोदयांच्या अध्यक्षतेखाली येत्या,गुरुवार,२२ जानेवारी रोजी परिषद सभागृह, ६ वा मजला,मंत्रालय, मुंबई येथे सकाळी ११ वाजतापासून आयोजित करण्यात आली आहे.त्यामुळे कोणत्या प्रवर्गाचा महापौर कोणत्या महानगरपालिकेमध्ये बसणार हे येत्या २२ जानेवारीला कळणार आहे.महापौरपदाचे आरक्षण चक्राकार पद्धतीने निश्चित करण्यात येते.समाजातील सर्व घटकांना महापौर पदाची संधी मिळावी,यासाठी चक्राकार पद्धतीने आरक्षणाची सोडत काढण्यात येते.सध्या कायद्यात एससी,एसटी,महिला आणि ओबीसींसाठी रोटेशनने आरक्षण आहे.मात्र,नियमातील नव्या बदलानुसार चक्राकार पद्धत नव्याने सुरु केली जाऊ शकते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री; एसटीच्या तिकीट दरात वाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्य परिवहन प्राधिकरणाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अर्थात एसटी बसेसच्या भाडेवाढीच्या प्रस्तावास मान्यता दिली आहे. आखाती देशांतील युद्धामुळे इंधनाच्या किंमतीत...

आता राज्यातील रुग्णालयांत इच्छामरणासाठी विशेष वैद्यकीय समित्या होणार स्थापन; शासन निर्णय जारी..

उद्रेक न्युज वृत्त :-जेव्हा एखादी व्यक्ती अत्यंत गंभीर व्याधीने ग्रस्त आणि दीर्घकाळ बेशुद्धावस्थेत राहते, तेव्हा अशी व्यक्ती स्वतः निर्णय घेऊ शकत नाही.अशा वेळी मरण...

महामार्गाच्या मध्यभागी आलेले पाणीपुरवठा योजनेचे चेंबर धोकादायक; संबंधित विभागाचे दुर्लक्ष.. – रविंद्र गोटेफोडे यांची तातडीने स्थलांतराची मागणी

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा शहरातून सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-५४३ च्या रुंदीकरणाच्या कामादरम्यान सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेचे चेंबर थेट रस्त्याच्या मध्यभागी आल्याने गंभीर अपघाताचा धोका निर्माण झाला...

सर्पदंश झाल्यास काय करावे आणि काय करू नये,घ्या जाणून.. – गडचिरोली जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यांत एकूण १३४ सर्पदंशाच्या घटनांची नोंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-पावसाळ्याच्या दिवसांत शेतीची कामे वाढल्यामुळे आणि बिळांमध्ये पाणी शिरल्यामुळे सापांचा मानवी वस्तीत व शेतात वावर वाढतो.गडचिरोली जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र व जंगलाचे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!