- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-कोल्हापूर जिल्ह्याच्या हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथील युवा बौध धम्म परिषद महाराष्ट्र व कर्नाटक राज्य यांच्या तर्फे काल रविवारी भंते नागरत्नजी सभामंडप यशवंत मंगल कार्यालयात पार पडलेल्या कार्यक्रमात रोहिणी पराडकर यांना भंते नागरत्नजी राज्यस्तरीय साहित्यरत्न कलाभूषण पुरस्काराने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.सदर कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी प्रसिद्ध अभिनेत्री चिन्मयी सुमित या होत्या,तर संस्थेचे संस्थापक प्रा.डॉ.किरण सदानंद भोसले,राज्याध्यक्ष प्रा.डॉ.संतोष भोसले,राज्य सचिव सतीश भारतवासी उपस्थित होते.यावेळी कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यातील विविध स्तरातील मान्यवर उपस्थित होते.
रोहिणी अमोल पराडकर ह्या कोल्हापूर येथील प्रसिद्ध कवयित्री व साहित्यिक आहेत.व्यवसायाने त्या लेडीज फोटोग्राफर असून अनेक सांस्कृतिक व साहित्यिक संस्थांचे सदस्य आहेत.त्यांचे “काव्यांजली,दत्त शब्दांजली,बालगीत,चिवचिवाट,काव्यसरीता आणि मधुबन” इत्यादी काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत. त्यांना विविध स्पर्धांतून अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.विविध वृत्तपत्रांतून व मासिकातून त्यांचे साहित्य नियमितपणे प्रकाशित होत असतात.विशेष म्हणजे, पराडकर या गडचिरोली नाट्यश्री स्पर्धेत सहभागी होत असतात.
- Advertisement -

