Wednesday, August 26, 2026
Homeमुंबई'मराठी गया तेल लगाने' असे वक्तव्य करणाऱ्याला मनसेच्या कार्यकर्त्यांनी धोपटले...

‘मराठी गया तेल लगाने’ असे वक्तव्य करणाऱ्याला मनसेच्या कार्यकर्त्यांनी धोपटले…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-नुकतेच राज्य शासनाने राज्यातील सर्व शासकीय कार्यालये तसेच निमशासकीय कार्यालयांमध्ये व इतर विविध आस्थापनांमध्ये मराठी भाषेत बोलणे अनिवार्य केले आहे.तत्पूर्वी गेल्या काही दिवसांमध्ये मराठी भाषा आणि मराठी माणसांच्या अवमाननेच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.अशातच एका कंपनीच्या सुरक्षा रक्षकाने मराठी भाषेबद्दल  अनादर करून ‘मराठी गया तेल लगाने’ असे वक्तव्य केल्यानंतर पवईमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्याला चांगलेच धोपटून महाराष्ट्रातील मराठी माणसाची तसेच राज ठाकरेंची माफी मागतो,असे म्हणायला लावत मनसे स्टाइलने समजावले.
पवईतील ‘एल अँड टी’ कंपनीचा सुरक्षा रक्षक व एक व्यक्ती काही मुद्यावरून संभाषण करू लागले. अशातच सुरक्षा रक्षक हिंदीमध्ये बोलू लागल्याने व्यक्तीने मराठीत बोला,मला हिंदी येत नाही,असे म्हटले.त्यावर सुरक्षा रक्षक मुझे मराठी नहीं आती, मै मराठी मे क्यूँ बोलू,मराठी गया तेल लगाने,असे वक्तव्य केले.सदर वक्तव्याचा व्हिडिओ वायरल होताच राज ठाकरेंच्या आदेशानंतर मनसे पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी तिथे पोहोचले व सर्वप्रथम मनसे सैनिकांनी सुरक्षा रक्षकाच्या कानाखाली लगावली व महाराष्ट्रात रहायचे असेल तर मराठी शिकावी लागेल आणि महाराष्ट्रातील मराठी माणसाची तसेच राज ठाकरेंची माफी मागतो,असे म्हणायला लावत मराठी शिका व मराठीत बोला,असे म्हणत कानाखाली वाजवली.यानंतर त्या सुरक्षारक्षकाने माफी मागत मी मराठी शिकण्याचा प्रयत्न करेन,असे म्हटले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी; दीड हजार खात्यात येण्यास सुरुवात..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेतील पात्र लाभार्थी महिलांसाठी शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने मोठा निर्णय घेत मागील जुलै महिन्याच्या प्रलंबित...

उद्याला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले गडचिरोली दौऱ्यावर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून)शिवेंद्रराजे भोंसले हे उद्या,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.या दौऱ्यात ते जिल्ह्यातील...

बापरे..! स्मशानभूमीत रात्रीच्या अंधारात अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार.. -मांत्रिक पळाला घटनास्थळावरून..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या कुही तालुक्यात एका अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार गाव नजीकच्या स्मशानभूमीत उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या...

कुरखेडा शहरात पैगंबर जन्मोत्सव विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-इस्लाम धर्माचे प्रवर्तक प्रेषीत मोहम्मद पैगंबर यांची १५०१ वी जयंती आज,बुधवार २६ ऑगस्ट रोजी कुरखेडा शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवित उत्साहात साजरी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!