Wednesday, July 29, 2026
Homeगडचिरोलीमतमोजणीची जबाबदारी काटेकोरपणे पार पाडा-जिल्हाधिकारी संजय दैने

मतमोजणीची जबाबदारी काटेकोरपणे पार पाडा-जिल्हाधिकारी संजय दैने

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त      

गडचिरोली :- मतमोजणी  प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांना सोपविलेली जबाबदारी कोणतीही हयगय होणार नाही; याची दक्षता घेवून काटेकोरपणे पार पाडावी व मतमोजणीची प्रक्रिया यशस्वी करावी; असे निर्देश जिल्हाधिकारी संजय दैने यांनी दिले. 

गडचिरोली-चिमूर(अ.ज) लोकसभा मतदारसंघात १९ एप्रिल २०२४ रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडली असून दिनांक-४ जून रोजी मतमोजणी होणार आहे. या अनुषंगाने मतमोजणी पूर्वतयारीचा आढावा व अधिकारी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आज बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित करण्यात आले होते.यावेळी मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी बोलत होते.बैठकीला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह, अतिरिक्त जिल्हाधिकारी विजय भाकरे,अप्पर पोलिस अधीक्षक कुमार चिंता,उपजिल्हा निवडणूक अधिकारी विजय घोडके,निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल सुर्यवंशी,जिल्हा पुरवठा अधिकारी प्रकाश पाटिल, तसेच सर्व सहायक निवडणूक अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

मतमोजणीसाठी नियुक्त अधिकाऱ्यांनी मतमोजणीच्या अनुषंगाने दिलेल्या जबाबदारीनुसार करावयाच्या कार्यवाहीबाबत सविस्तर माहिती करुन घेण्याचे व आवश्यक साहित्याची पूर्वपडताळणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या.सुरक्षा यंत्रणा, टपाली मतपत्रिका मोजणी पथक,मतमोजणी मनुष्यबळ व्यवस्थापन पथक,साहित्य व्यवस्थापन पथक,निवडणूकयंत्र सिलींग पथक, मतमोजणी समन्वय व अहवाल संकलन पथक या पथकांचा जिल्हाधिकाऱ्यांनी सविस्तर आढावा घेऊन त्यांना आवश्यक सूचना केल्या.त्याप्रमाणेच मतमोजणीच्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त,आरोग्य सुविधा,स्वच्छता,  इंटरनेट सुविधा,मिडिया कक्ष,याबाबतही माहिती घेऊन संबंधित नोडल अधिकाऱ्यांना जबाबदारी व्यवस्थित पार पाडण्याचे निर्देश दिले.मतमोजणी केंद्रात मतमोजणीच्या दिवशी मोबाईल वापरण्यास भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रतिबंध असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. 

यावेळी मतमोजणीच्या अनुषंगाने सहायक निवडणूक अधिकारी यांनी सादरीकरणाद्वारे प्रशिक्षण दिले. राहुल मीना(गडचिरोली) यांनी कायदेशीर बाबी व सर्वसाधारण सूचना,किशोर घाडगे (चिमूर) यांनी मतदानयंत्राद्वारे मतमोजणी,आदित्य जीवणे (अहेरी) यांनी व्हीव्हीपॅट मोजणी,कविता गायकवाड (आमगाव)यांनी पुर्नमतमोजणी,श्रीमती मानसी (आरमोरी) यांनी निकालाची घोषणा व अहवाल सादरीकरण,श्री संदिप भस्के (ब्रम्हपूरी) यांनी मतदान यंत्राचे सिलींग या विषयावर मार्गदर्शन केले.यावेळी मतमोजणीसाठी नियुक्त नोडल अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तुकाराम मुंढेंनी शाळा व्यवस्थापनावर सोपवली मोठी जबाबदारी; विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी विविध निर्णय..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या धडक कारवाईचे सत्र सुरू असतांनाच आता अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी...

माझा वाढदिवस-एक झाड उपक्रम; देसाईगंज आदर्श महाविद्यालयाच्या वतीने पर्यावरण संवर्धनाचा संदेश..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचावा आणि वृक्षारोपणाची सवय प्रत्येकामध्ये रुजावी या उद्देशाने आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,देसाईगंज येथे "माझा वाढदिवस-एक झाड" हा...

राज्यांतर्गत पिकस्पर्धा; आता शेतकऱ्यांना घरबसल्या अर्ज करण्याची सुविधा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील अन्नधान्य,कडधान्य व गळीतधान्य पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी तसेच प्रयोगशील व प्रगतशील शेतकऱ्यांच्या कार्याचा गौरव करून आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने...

राज्य सरकार म्हणतेय; गौण खनिजांच्या अवैध उत्खनन आणि वाहतुकीवर दहापट दंड आकारू.. -चोर खरोखरच चोऱ्या करणे सोडणार काय?

उद्रेक न्युज वृत्त :-गौण खनिजांची चोरी करणे ही काही चोरट्यांसाठी नित्याचीच बाब झाली आहे.काहींना अवैध रेती,मुरूम,दगड,माती व इतर गौण खनिजांची चोरी केल्याशिवाय चैनच पडेनासे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!