Wednesday, September 2, 2026
Homeनागपूरभेंडीच्या भाजीवरून आई सोबत वाद; अल्पवयीन मुलाने घर सोडत गाठली थेट दिल्ली..

भेंडीच्या भाजीवरून आई सोबत वाद; अल्पवयीन मुलाने घर सोडत गाठली थेट दिल्ली..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-घर सोडून जाण्याचे आतापर्यंत अनेक किस्से ऐकले.पण,चक्क भाजी आवडली नाही म्हणून वाद झाला आणि अल्पवयीन मुलगा थेट दिल्लीला गेला. प्रसंगी नागपूर पोलिसांनी अल्पवयीन मुलाला शोधून काढत कुटुंबियांच्या स्वाधीन केल्याची घटना नागपूरच्या कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली.१७ वर्षीय अल्पवयीन मुलगा आणि त्याची आई कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीत वास्तव्यास राहतात.शुक्रवार ११ जुलैच्या रात्री मुलाच्या आईने जेवणासाठी भेंडीची भाजी बनवली.त्या रात्री अल्पवयीन मुलाचे आणि त्याच्या आईचे भेंडीच्या भाजीवरून भांडण झाले.मुलाला भेंडीची भाजी आवडली नसल्यामुळे त्याने खाण्यास नकार दिला.त्यामुळे आई मुलाला रागावली आणि याच रागातून त्याने चक्क घर सोडून थेट दिल्ली गाठली.घर सोडून निघून जातांना त्याने स्वतः जवळचा मोबाईलही स्विच ऑफ केला होता.त्यामुळे त्याचा शोध लागत नव्हता.कुटुंबीयाने मित्रमंडळी तसेच नातेवाईकांकडे शोध घेतला.पण,मुलाचा कुठेही थांगपत्ता लागला नाही.अखेर कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दिली.कोतवाली पोलिसांनी मुलगा अल्पवयीन असल्यामुळे संवेदनशीलता बाळगत तात्काळ शोध मोहीम राबवली.१७ वर्षीय मुलाने मोबाईल स्विच ऑफ केल्यामुळे त्यासाठी सायबर सेल विभागाने युक्ती लढवत त्याच्या मोबाईलवर लिंक पाठवली.मुलाने मोबाइल सुरू करताच पोलिसांना त्याच्या मोबाईलचे लोकेशन मिळाले.मुलाचे लोकेशन मिळाल्यानंतर तो मथुराला असल्याचे पोलिसांना कळले.त्यानंतर तो दिल्लीला गेल्याचे लोकेशन मिळताच दिल्ली पोलिसांची मदत घेण्यात आली व नागपूर पोलिसांनी त्याला नागपुरात आले.कुटुंबीयांनी नागपूर पोलिसांचे कौतुक करतसत्कार केला.आजची तरुणाई क्षुल्लक कारणावरून टोकाचे पाऊल उचलत असल्याचे दिसून येते.त्यामुळे आई-वडिलांनी करावे तरी काय? असा गहन प्रश्न जन्मदात्यांना पडू लागलाय.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जागतिक नारळ दिन विशेष..! नारळ लागवड; शाश्वत उत्पन्नाचा ‘कल्पवृक्ष’..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आज बुधवार २ सप्टेंबर दरवर्षी २ सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक नारळ दिन’ म्हणून साजरा केला जातो. नारळाच्या झाडाचा जवळपास प्रत्येक भाग उपयोगात...

धक्कादायक..! जेवणाच्या डाळभाजीत पाल; ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डाळभाजीत पाल (विचगुर)पडल्याने तब्बल ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे जाणवू लागल्याची घटना आज,मंगळवार १ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या...

अनाथ बालकांना योजनांचा लाभ वेळेत देण्याचे जिल्ह्याधिकाऱ्यांचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात महिला व बालकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांपर्यंत त्यांचा लाभ वेळेत पोहोचवावा.बालविवाह व अल्पवयीन मातांशी...

आजपासून बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांसाठी ‘एनसीएमसी’ कार्ड अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या विविध सवलतधारक प्रवाशांसाठी आज,मंगळवार १ सप्टेंबर पासून 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' म्हणजेच संपर्करहित स्मार्ट कार्ड (एनसीएमसी)अनिवार्य करण्यात आले...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!