Thursday, April 30, 2026
Homeगोंदियाभरधाव कारने दोन जणांसह सायकलस्वाराला दिली धडक... - तीघेजण गंभीर जखमी...

भरधाव कारने दोन जणांसह सायकलस्वाराला दिली धडक… – तीघेजण गंभीर जखमी…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-रस्त्याच्या कडेला बसलेल्या दोन जणांसह एका सायकलस्वाराला भरधाव कारने धडक दिल्याची घटना गोंदिया पॉलिटेक्निक समोर आज,सोमवार २ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास घडली. अपघातामध्ये तीन युवक गंभीर जखमी झाले आहेत.
खोमेश उरकुडे वय.२४ वर्षे रा.कोसेटोला,गोरेगाव, हेमराज राऊत वय ५४ वर्षे रा.कारंजा आणि कादीर शेख वय ३८ वर्षे रा.फुलचुर अशी जखमींची नावे आहेत.
स्थानिक पॉलिटेक्निक कॉलेज परिसरातच ट्रकचे वाहनतळ आहे.त्यामुळे परिसरात नेहमीच ट्रक चालक रस्त्याच्या कडेवरील चायटपरी आदी ठिकाणी बसून असतात.दरम्यान,घटनेच्या वेळी सकाळी गोरेगावकडून गोंदिया कडे येत असलेल्या भरधाव कारने पॉलिटेक्निक कॉलेज पुढील रस्त्याच्या कडेवरील ओट्यावर बसून असलेल्या दोन ट्रक चालकासह त्या ठिकाणाहून जात असलेल्या सायकल स्वारला धडक दिली.धडक दिल्यानंतर कार अनियंत्रित होऊन रस्त्याच्या शेजारी उलटली ज्यात कार चालकही जखमी झाला.या घटनेचा व्हिडीओ परिसरातील सीसीटीव्हीत कॅमेऱ्यात कैद झाला असून घटनेची नोंद पोलिसात झाली नसली तरी याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल झाला आहे.सर्व जखमींवर गोंदियाच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

“आपण लोकांची कामे करण्यासाठी बसलो आहोत; अडवणूक करण्यासाठी नाही”.. -सहपालकमंत्र्यांकडून अधिकाऱ्यांची कानउघडणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे संपूर्ण मॅपिंग करून शासनाने स्वतः त्यांच्या दारात जाऊन गरजेनुसार योजनांचा लाभ द्यावा,अशी भूमिका कृषी राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष...

अखेर कुरखेडा नगरपंचायत सफाई कामगारांच्या बेमुदत संपावर तोडगा; संप मागे..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा नगरपंचायत अंतर्गत कार्यरत सफाई कामगारांंनी थकीत वेतनाकरीता मागील २३ एप्रीलपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले होते.त्यामुळे शहरातील स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण...

कायदा हा लवचिक आणि बदलत्या काळाशी सुसंगत असावा- सर्वोच्च न्यायालय – गर्भपाताची परवानगी दिली नाही; तर पीडितेच्या मनावर आयुष्यभर न पुसली जाणारी जखम आणि...

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच २४ एप्रिल २०२६ रोजी न्यायमूर्ती बी.व्ही.नागरत्ना आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठाने एका १५ वर्षीय बलात्कार पिडीत तरुणीला ३० आठवड्यांचा...

बच्चू कडूंनी धनुष्यबाण घेतला हाती; शेतकरी,मजूर,दिव्यांगांसाठी निर्णय..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दिव्यांग,शेतकरी आणि गोरगरिबांसाठी लढणारा 'रॉबिनहूड' नेता माजी मंत्री तथा प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी आज,गुरुवार ३० एप्रिल रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!