Saturday, August 29, 2026
Homeभंडाराबोगस दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे शासकीय नोकरी; तिघांना घरचा रस्ता तर तिघे निलंबित.....

बोगस दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे शासकीय नोकरी; तिघांना घरचा रस्ता तर तिघे निलंबित.. – नायब तहसीलदारही रांगेत उभे..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-महाराष्ट्र राज्याच्या दिव्यांग कल्याण विभागाच्या सचिवपदाची जबाबदारी तुकाराम मुंढे यांच्याकडे देण्यात आली आहे.तुकाराम मुंढे हे शिस्तप्रिय अधिकारी असून ते जिथे जातात तिथे त्यांचा दबदबा असतो.त्यांच्या धडाकेबाज कार्यपद्धतीमुळे त्यांचे नाव अनेक लोकप्रतिनिधींच्या ब्लॅकलिस्टमध्ये कोरल्या गेल्या आहे.तुकाराम मुंढे हे २००५ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.ते त्यांच्या प्रामाणिकपणासाठी प्रसिद्ध आहेत.त्यामुळे त्यांना बदल्यांचा सुलतान म्हणतात,कारण त्यांच्या २० वर्षांच्या कारकिर्दीत त्यांची २३ वेळा बदली झाली आहे.५ ऑगस्ट २०२५ रोजी त्यांची मुंबईच्या असंघटित कामगार विकास आयुक्त पदावरून मुंबईच्या मंत्रालय विभागातील दिव्यांग कल्याण विभागाच्या सचिव पदी नियुक्ती करण्यात आली.अश्यातच दिव्यांगांसाठीच्या योजनांचा लाभ बोगसगिरीने घेणाऱ्यांविरुद्धची मोहीम त्यांनी सुरू केली.राज्यातील बोगस दिव्यांगांची झाडाझडती घेण्याचे लेखी आदेश राज्याच्या दिव्यांग कल्याण विभागाच्या सचिवपदाची जबाबदारी असलेले तुकाराम मुंढे यांनी गुरुवार,१८ सप्टेंबर २०२५ रोजी राज्यातील सर्व विभागांना दिले होते. आदेश मिळताच सर्व विभागातील दिव्यांग प्रमाणपत्रांच्या पडताळणीला सुरुवात करण्यात आली होती.त्यानुसार,भंडारा जिल्ह्यातील अपंगत्व नसतांना वा अपंगत्वाचे प्रमाण जास्त दाखवून बोगस प्रमाणपत्राद्वारे नोकरी मिळवणाऱ्या कर्मचाऱ्यांची विशेष समितीमार्फत चौकशी करण्यात आली.नागपूर येथील वैद्यकीय मंडळाने महसूल विभागातील २२ दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्रांची पुनर्तपासणी केली.या तपासणीत तब्बल सात अधिकारी,कर्मचाऱ्यांची प्रमाणपत्रे बोगस असल्याचे निष्पन्न झाले.शासनाची दिशाभूल करून नोकरी मिळवल्याचा ठपका ठेवत जिल्हा निवड समितीने वसुंधरा वासनिक (इंगळे),मंडळ अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा(पुनर्वसन शाखा),शारदा सूर्यभान झंझाड, तलाठी,मोहाडी,विनोद भावे,तलाठी, मोहाडी यांना बडतर्फ करून घरचा रस्ता दाखवला आहे. तर शिवशंकर साखरवाडे,सहाय्यक महसूल अधिकारी, योगराज बाबुराव डांबरे,तलाठी-लाखनी,दिलीपसिंग भरतसिंग ठाकूर,सहाय्यक महसूल अधिकारी,पवनी यांना निलंबित करण्यात आले आहे.त्याचबरोबर,भंडारा येथील नायब तहसीलदार आनंद हट्टेवार यांना बडतर्फ करण्याचा प्रस्ताव जिल्हा निवड समितीने शासनाकडे पाठविला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गरोदर मातेला नेले झोळीतून; घटनेनंतर प्रशासनाला आली जाग.. -आता कोईदूळ नाल्यावरील पुलाचा प्रश्न मार्गी लागणार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील कोईदूळ गावातील रहिवासी छाया सुरेश नैताम वय २६ वर्षे यांना आज,शुक्रवार २८ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास प्रसूती कळा सुरू...

सोशल मीडियावर जातीवाचक वक्तव्य करणे कराळे मास्तरला चांगलेच भोवले; अटक करून कारागृहात रवानगी..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-वर्ध्यातील 'फिनिक्स अकॅडमी'चे संचालक, सामाजिक कार्यकर्ते तथा सोशल मीडिया इन्फ्लुएंसर असलेले कराळे मास्तर यांना सोशल मीडियावर एका विशिष्ट समाजाविषयी जातीवाचक वक्तव्य...

आता मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींची जबाबदारी नेमकी कोणाकडे? -तसेही “सरपंच-प्रशासक” बिन पगारी अन् फुल्ल अधिकारीच..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य शासनाने गावगाडा हाकणाऱ्या पदाधिकाऱ्यांना मोठा दिलासा देत शनिवार २१ फेब्रुवारी २०२६ रोजी महाराष्ट्र राज्यातील ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपली वा...

राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांच्या अंगरक्षकावर महिलेचा लैंगिक शोषणाचा आरोप; पोलिसांत गुन्हा दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याचे वित्त व नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधि व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांच्या ३८ वर्षीय अंगरक्षकाने(पोलीस कर्मचारी)एका विवाहित...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!