Wednesday, September 23, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तबंदूक हातातून पडली अन् एक गोळी सिने अभिनेता गोविंदालाच लागली...

बंदूक हातातून पडली अन् एक गोळी सिने अभिनेता गोविंदालाच लागली…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-स्वतःच्याच बंदुकीमधून गोळी सुटली आणि ती गोविंदालाच लागली आहे.यामुळे गोविंदा जखमी झाला.अभिनेता गोविंदाला क्रिटी केअर हॉस्पिटलच्या आयसीयू मध्ये दाखल करण्यात आले.अभिनेता तथा शिवसेना नेता गोविंदा कोलकात्याला रवाना होण्याच्या तयारीत होता.त्या दरम्यान,परवाना असलेली बंदूक ठेवत असताना हातातून पडली आणि एक गोळी त्याच्या पायाला लागली.लगेच गोविंदाला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.डॉक्टरांनी गोळी काढली असून त्यांची प्रकृती बरी आहे.सध्या रुग्णालयात आहेत.गोविदांने पायाची शस्त्रक्रिया झाल्यानंतर पहिल्यांदा प्रतिक्रया दिली.गोविंदा म्हणतो की, ‘तुमच्या सगळ्यांचा आशिर्वाद आणि पालकांचा आशिर्वाद, गुरुंच्या कृपेमुळे जी गोळी लागली होती ती काढण्यात आली आहे.मी रुग्णालयातील डॉक्टरांचे मनापासून आभार मानतो.तुमच्या सगळ्यांची प्रार्थना महत्त्वाची ठरली.सगळ्यांचे आभार आणि धन्यवाद’.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

भरधाव वाहनाच्या धडकेत वाघिणीचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-एका अज्ञात वाहनाने जंगल परिसरातून मार्गक्रमण करीत महामार्ग ओलांडणाऱ्या वाघिणीला जोरदार धडक दिल्याने धडकेत वाघिणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज,मंगळवार २२...

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकांचा बिगुल वाजला.. -शिक्षक-पदवीधर मतदार संघात कोण मारणार बाजी?

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकांचा बिगुल आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी निवडणूक आयोगाने जाहीर केला.त्यानुसार,तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा करण्यात...

जन सेवेतुनच खरी इश्वराची आराधना-किशन नागदेवे -साई मंदिर देवस्थान समितीच्या उपक्रमातून तब्बल २ हजार ५०० रुग्णांची मोफत तपासणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज येथील राजेंद्र  वार्डातील प्रसिद्ध साई मंदिर देवस्थान समितीच्या वतीने आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी गणेशोत्सव निमित्त  मोफत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आला.या...

‘लोकसंवाद-२०२६’मधून रक्तदान व रक्तसुरक्षिततेविषयी विशेष जनजागृती कार्यक्रम संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गणेशोत्सवानिमित्त माहिती व जनसंपर्क विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या ‘लोकसंवाद- २०२६’ उपक्रमांतर्गत आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात रक्तदान व रक्तसुरक्षिततेविषयी विशेष...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!