- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-सायबर चोरटे विविध युक्त्या वापरून ऑनलाईन फसवणूक करतांना तर दिसून येतच आहेत.अशातच चक्क बँकेचे सिस्टम हॅक करून बँकेतील रकमेवर डल्ला घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची एनएएफटी व आरटीजीएस करण्याची ऑनलाइन प्रणाली हॅक करून सायबर चोरट्यांनी तब्बल ३ कोटी ७० लाख रुपये लंपास केल्याची घटना काल बुधवारी समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.बँक व्यवस्थापकांनी याबाबतची तक्रार रामनगर व सायबर पोलिस ठाण्यात केली आहे.जिल्ह्यात असा प्रकार पहिलाच असल्याचे बोलले जात आहे.
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचा विस्तार जिल्हाभरात झाला आहे.येथील खातेदारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.ही बँक एका शासकीय बँकेशी लिंकअप आहे.त्याद्वारे ऑनलाइन व्यवहार केले जातात.या बँकेतून दररोज आरटीजीएस व एनएएफटी केली जाते.दरम्यान,७ फेब्रुवारी व १० फेब्रुवारीला अज्ञाताने आरटीजीएस व एनएएफटीची करण्याची ऑनलाइन प्रक्रियाच हॅक करून तेथून सर्व रक्कम दिल्ली व नोएडा येथील बँक खात्यावर वळती केली.ही बाब समोर येताच बँक व्यवस्थापनात खळबळ उडाली.दरम्यान,व्यवस्थापकांनी रामनगर पोलिस स्टेशन गाठून याबाबतची तक्रार दिली. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता आणि माहिती व तंत्रज्ञान कायद्यान्वये विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.स्टेशनमध्ये याबाबतची तक्रार दाखल होताच चंद्रपूर सायबर पोलिसांनी ३३ ट्रॉन्झेक्शन फ्रीझ करून ६० लाख ६४ हजार ५८२ रुपये परत जमा केले, तर ७१ लाख ३४ हजार ७३७ रुपये विविध बँक खात्याच्या अकाउंटला होल्ड झाले आहेत. सायबर पोलिसांच्या तत्काळ अॅक्शनने एक कोटी ३१ लाख ९९ हजार ३१९ रुपये वाचविण्यास यश आले आहे.
- Advertisement -

