Monday, August 24, 2026
Homeभंडाराफुल तोडायला तलावात उतरलेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू..!

फुल तोडायला तलावात उतरलेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-कमळाचे फुल तोडायला तलावात उतरलेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील निलज गाव नजिक असलेल्या तलाव परिसरात काल,मंगळवार २१ ऑक्टोंबर रोजी सायंकाळच्या सुमारास घडली असून आज,बुधवार २२ ऑक्टोंबरला सकाळच्या सुमारास शवविच्छेदन अहवाल तयार करून मर्ग दाखल करण्याची प्रक्रिया पोलिसांनी पार पाडली. प्रतिक सुखदेव शेंडे वय १९ वर्षे,रा.निलज, ता.साकोली,जि.भंडारा असे तलावात बुडून मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे.ऐन दिवाळी सणाच्या दिवशीच घडलेल्या घटनेने कुटुंबीयांसह गावात शोककळा पसरली आहे.
प्रतीक शेंडे हा काल मंगळवारी घरी लक्ष्मीपूजनाचा कार्यक्रम असल्याने सायंकाळी साडेपाचच्या सुमारास दोन मित्रांसोबत गाव नजिक असलेल्या तलाव परिसरात कमळाची फुले आणण्यासाठी गेला होता.दरम्यान, कमळाचे फुल तोडण्यासाठी तलावात उतरला असता खोल पाण्यात गेला.पाण्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करीत असतांनाच तो तलावातील इतर झाडांच्या वेलित अडकला.यातच प्रतीकचा तलावात बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती मित्रांनी ग्रामस्थांना देताच गावकऱ्यांनी घटनास्थळ गाठून साकोली पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी पथकासह घटनास्थळी दाखल होत मृतदेह साकोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करून पुढील प्रक्रिया पार पाडून मर्ग दाखल केला.ऐन दिवाळी सणात तरुणाचा मृत्यू झाल्याने शेंडे कुटुंबियांवर दुःखाचे डोंगर कोसळले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

माता व बालक मृत्यू प्रकरणी चौकशी समिती गठीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या चामोर्शी येथील प्रसूती प्रकरणात माता व बालकाच्या मृत्यूची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक स्तरावर चौकशी समिती गठीत करण्यात...

देसाईगंज आदर्श महाविद्यालयात वाणिज्य विद्यार्थी अभ्यास मंडळाची स्थापना.. – विद्यार्थ्यांनी आत्मनिर्भर बनावे- प्रा.डॉ.निलेश हलामी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देसाईगंज येथे महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डाॅ.श्रीराम गहाणे यांच्या मार्गदर्शनात शैक्षणिक सत्र २०२६-२७ करिता वाणिज्य विद्यार्थी अभ्यास मंडळाची स्थापना...

धावत्या बसमधून खाली कोसळताच दुसऱ्या बसने चिरडले; तरुणीचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-पुण्यातील सिंहगड मार्गावरील माणिकबाग परिसरात आज,सोमवार २४ ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडली. खानापूर-स्वारगेट मार्गावरील धावत्या पुणे...

जोरदार पावसाचा फटका; वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता.. – वैनगंगा नदीकिनारी राहणाऱ्यांना सतर्क राहण्याचा सल्ला..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने धानासह अन्य खरीप पिकांच्या स्थितीबाबत शेतकऱ्यांची चिंता वाढली होती.अशा परिस्थितीत काल रविवारी झालेला पाऊस पिकांसाठी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!