- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यातील मुख्य बाजारपेठ म्हणून उदयास आलेल्या देसाईगंज शहरात दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरी केली जाते.हजारो शिवप्रेमी एकत्र येत हातात भगवे झेंडे घेऊन जयघोष करीत उत्सव साजरा करीत असतात.एवढा मोठा उत्सव साजरा करूनही
दुर्दैवाने शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा एकही पुतळा नाही? ही खेदजनक बाब लक्षात घेता देसाईगंज शहराचे युवा नेते पिंकू बावणे यांनी पुढाकार घेत फवारा चौकात शिवरायांचा भव्य पुतळा उभारून सदर चौकास “शिवाजी महाराज चौक” असे नामकरण करण्यात यावे; अशी मागणी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
शहरात शिवरायांचा पुतळा नसणे दुर्दैवी👇
शिवरायांचे विचार,त्यांचे पराक्रम यांची जाणीव प्रत्येक पिढीला व्हावी यासाठी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी त्यांचा भव्य पुतळा असणे गरजेचे आहे.मात्र,आजवर देसाईगंजमध्ये कोणत्याही चौकात शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आलेला नाही.
तीव्र आंदोलनाचा इशारा👇
युवा नेते पिंकू बावणे यांनी नगर प्रशासनाला ठरावीक वेळेत निर्णय घेण्याचे आवाहन केले आहे.मागणी पूर्ण न केल्यास शिवप्रेमींना सोबत घेऊन मोठे आंदोलन उभारले जाईल,असाही इशारा त्यांनी दिला आहे.
शहरातील नागरिक आणि व्यापाऱ्यांचा मोठा पाठिंबा👇
शहरातील व्यापारी संघटना,युवक,शिवप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर या मागणीला पाठिंबा देत आहेत.फवारा चौकात महाराजांचा पुतळा बसवण्यास विरोध करणाऱ्या प्रवृत्तींना शिवप्रेमी कधीही माफ करणार नाहीत,असा इशारा नागरिकांनी दिला आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार,देसाईगंज शहरात मागणीला घेऊन वातावरण चांगलेच तापलेले दिसून येत आहे.त्यामुळे नगर प्रशासनाने वेळेत निर्णय न घेतल्यास शिवप्रेमींच्या रोषाला सामोरे जावे लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.अश्यातच आता मागणी संदर्भात नगर प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
- Advertisement -

