- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-भंडारा-नागपूर या राष्ट्रीय महामार्गावर अलीकडे रेतीच्या चोरट्या वाहतुकीचे प्रमाण वाढले आहे. सदरची रेती ही भंडारा जिल्ह्यातील तुमसर तसेच गोंदिया जिल्ह्यातून तुमसर,भंडारा,मौदामार्गे नागपूर शहराच्या दिशेने नेली जाते.महामार्गावर तुमसर,भंडारा व मौदा पोलिसांची सतत गस्त असली तरी रेती वाहतुकीचे टिप्पर बिनबोभाटपणे धावतांना दिसून येतात.ओव्हरलोड व वेगात जाणाऱ्या टिप्परमुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.त्यातील बहुतांश टिप्पर विना रॉयल्टी रेती वाहतूक करीत असल्याने राज्य सरकारला महसुलावर पाणी सोडावे लागत असून,या प्रकाराकडे महसूल आणि पोलिस विभागाने दुर्लक्ष केले आहे.
भंडारा-नागपूर महामार्गावरील बोरगाव ते मौदादरम्यान अनेक नागरिक रोज सकाळी फिरायला जातात.बहुतांश टिप्परमध्ये विना रॉयल्टी आणि क्षमतेपेक्षा अधिक रेती राहत असल्याने रेती वाहतुकीच्या ओव्हरलोड टिप्परचा वेग विचारात घेता अपघाताचा धोका बळावला आहे. पोलिस व महसूल विभाग या रेती चोरट्यांवर प्रभावी कारवाई करत नसल्याने त्यांची हिंमत वाढली आहे. वारंवार तक्रारी करूनही या दोन्ही विभागातील अधिकारी कारवाई करीत नाही.विशेष म्हणजे, महामार्गालगतच्या एका हॉटेलमध्ये महसूल विभागाचे अधिकारी रात्री ८ नंतर जातात आणि रेती चोरट्यांसोबत पैशांची देवाण-घेवाण होत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.तेथील सीसीटिव्ही कॅमेरे चेक केल्यास ‘दूध का दूध पाणी का पाणी’ होणार असे काहींचे म्हणणे आहे.
- Advertisement -

