Tuesday, July 21, 2026
Homeनागपूरपैसे दुप्पट होण्याचे आमिष; १५ जणांना २८ लाख रुपयांना चुना.. - चार...

पैसे दुप्पट होण्याचे आमिष; १५ जणांना २८ लाख रुपयांना चुना.. – चार आरोपी अटकेत..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-अनेकजण पैश्यासाठी वाट्टेल ते करायला तयार असतात.त्यात दिलेले पैसे दुप्पट होणार म्हटले की, अनेकांना मोठी हाव सुटत असते खरी,पण तीच हाव एक दिवस घातक ठरत असते.असाच काहीसा प्रकार नागपूरच्या मानकापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेला असून पैसे दुप्पट होण्याच्या आमिषाचे तब्बल १५ जण बळी पडले आहेत.चार आरोपींनी मिळून तब्बल २८ लाख ८ हजार रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे.अशोककुमार सिरोटिया वय ५४ वर्षे,रा.कोहळे ले आऊट,खडगाव रोड,वाडी,धीरज अर्जुन पाल वय ४० वर्षे,रा.महादेवनगर,लाव्हा, वाडी,प्रकाशचंद जैन (जयपूर) व रवी जैन (जयपूर)अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.तर ४६ वर्षीय खुशाल टीकाराम चवडे रा.रजत एन्क्लेव्ह, झिंगाबाई टाकळी असे तक्रारदाराचे नाव आहे.
तक्रारदार खुशाल यांची २०२२ मध्ये आरोपींशी  ओळख झाली होती.आरोपींनी ‘माय व्हिक्टरी क्लब प्रा. लि.’ नामक कंपनी असून या कंपनीत गुंतवणूक करा आणि काही दिवसांतच पैसे दुप्पट मिळवा,असा दावा आरोपींनी केला होता.त्यांच्यावर विश्वास ठेवून खुशाल यांनी पैसे गुंतविले होते.खुशाल यांच्यासोबत आणखी १४ जणांकडून आरोपींनी डिसेंबर २०२२ ते नोव्हेंबर २०२५ या कालावधीत ३१ लाख ७० हजार रुपये घेतले. आरोपींनी परतावा म्हणून ३ लाख ६१ हजार रुपये परत केले.मात्र,त्यानंतर कुठलाही नफा किंवा परतावा दिला नाही.खुशाल व इतर गुंतवणूकदारांनी पैशांची मागणी केली असता आरोपींनी टाळाटाळ केली.नंतर संपर्कच तोडला. अखेर २८ लाख ८ हजार रुपयांच्या फसवणूक प्रकरणात खुशाल यांनी पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी चारही आरोपींविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.आरोपींनी अश्या प्रकारे आणखी लोकांना गंडा घातल्याचा पोलिसांना संशय आहे.कुणाचे पैसे आरोपींनी बुडविले असतील तर कागदपत्रांसह त्वरित संपर्क साधावा,असे आवाहन वरिष्ठ पोलिस निरीक्षक हरीश काळसेकर यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आंधळी येथे मोफत नेत्रसेवा शिबिर संपन्न; ११७ जणांची तपासणी,तर ३२ रुग्णांवर होणार मोफत शस्त्रक्रिया..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार नेत्रसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महात्मे आय बँक हॉस्पिटल नागपूर,समता फाउंडेशन मुंबई,आधार ग्रामीण विकास संस्था आंधळी आणि गट...

सोनम वांगचुक समर्थनाथ कुरखेड्यात रिपाईच्या वतीने निदर्शने व निवेदन सादर..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-परीक्षांच्या नावाखाली विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणे सुरू झाले आहे. रात्रंदिवस मेहनत घेऊन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना काही दिवसांतच कळतेय की अगोदरच पेपरची कॉपी...

डीएपी खताच्या जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम; शेतकऱ्यांनी पिकांच्या गरजेनुसार पर्यायी खतांचा वापर करण्याचे आवाहन.. -प्रत्यक्ष खताच्या गोणीवरील छापील किंमत पाहूनच खत खरेदी करावे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-डीएपी खताच्या जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम झाल्याने राज्यासह गडचिरोली जिल्ह्यातही डीएपी खताचा पुरवठा अपेक्षेप्रमाणे होत नसल्याने शेतकऱ्यांनी पिकांच्या गरजेनुसार पर्यायी खतांचा...

नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन..पुढील चोवीस तास महत्वाचे; चार जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र राज्यातील विविध भागात पावसाने जोरदार हजेरी लावल्याचे चित्र आहे. हवामान विभागाने नुकतेच १९ जुलै ते २३ जुलै दरम्यान पाच दिवसांसाठी जोरदार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!