Sunday, May 3, 2026
Homeनागपूरपत्नीसाठी धावला पण त्याचाच जीव गेला.. - रेल्वेखाली येऊन बीएसएफ जवानाचा मृत्यू..

पत्नीसाठी धावला पण त्याचाच जीव गेला.. – रेल्वेखाली येऊन बीएसएफ जवानाचा मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-धावत्या रेल्वेत चढत असतांना पत्नीचा तोल जाऊन ती रेल्वेखाली येणार तेवढ्यात बीएसएफचा जवान असलेल्या पतीने धाव घेतली.तिला वाचविण्याच्या प्रयत्न तो रेल्वेखाली आला.क्षणार्धात त्याचा जीव गेला.महिलाही रेल्वेखाली येणार तोच ओमप्रकाश नावाच्या प्रवाशाने जीव धोक्यात घालून महिलेचे प्राण वाचवले.
पौर्णिमा सिंग वय ५० वर्षे रा.येलंगा,बेंगळुरू असे बचावलेल्या महिलेचे नाव आहे.तर त्यांचे पती काशिनाथ सिंग वय ५५ वर्षे यांचा मृत्यू झाला. बीएसएफ कमांडंटच्या उपस्थितीत त्यांच्या पार्थिवावर नागपुरातच अंत्यसंस्कार करण्यात आले.मूळचे उत्तर प्रदेशचे काशिनाथ सिंग बीएसएफ (ओडिशा) येथे कार्यरत होते.नोकरीनिमित्ताने ते बेंगळुरूला स्थायीक झाले.त्यांना पत्नी पौर्णिमा आणि दोन मुले आहेत. पत्नी आणि मोठा मुलगा नवनीत कुमार असे तिघेही प्रयागराजला जाण्यासाठी रेल्वेने निघाले.दानापूर हमसफर एक्स्प्रेसने ते प्रवास करीत होते.दुपारी १.३० वाजता नागपूर रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म एकवर गाडी आली.प्रवासात थकल्याने पती-पत्नी खाली उतरले.यावेळी मुलगा नवनीत गाडीतच बसला होता.वेळ होताच गाडी पुढील प्रवासाला निघाली.पती-पत्नी चर्चा करीत असल्याने त्यांचे लक्ष नव्हते. पौर्णिमाने धावत्या रेल्वेत चढण्याचा प्रयत्न केला. मात्र,गेटच्या लोखंडी दांड्यावर त्यांच्या बोटांची पकड सैल झाली.त्या गाडी आणि फलाटाच्या गॅपमध्ये फसल्या.जीवन- मृत्यूशी संघर्ष पाहून पती वाचविण्यासाठी धावले.मात्र,पत्नीला वाचविण्याच्या प्रयत्नात तेच गॅपमधून खाली गेले.दरम्यान देवदूताच्या रूपात आलेला ओमप्रकाश डहाके (रा.पाचपावली) या युवकाने महिलेचा हात पकडून तिला ओढले.तिला वाचविण्याच्या प्रयत्नात तोही दूरपर्यंत घासत गेला. फलाटावरील उपस्थित प्रवाशांच्या डोळ्यादेखत हा थरार घडला.सदरची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. आरपीएफ जवान आशिषकुमार यांनी दोघांनाही रुग्णालयात नेले.डॉक्टरांनी तपासून काशिनाथला मृत घोषित केले.शवविच्छेदनानंतर काशिनाथचे पार्थिव पत्नीच्या स्वाधीन करण्यात आले.त्यांच्या अपघाती मृत्यूची बातमी बीएसएफला दिली.तसेच काही सहकारी थांबले.बीएसएफ कमांडंच्या उपस्थितीत मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी तोफांची सलामी देण्यात आली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अचानकपणे रानडुकरांचा कळप मार्गावर आला; धाडकन दोन दुचाक्या धडकल्या.. – तिघेजण गंभीर जखमी,तर एकजण किरकोळ जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-दुचाकीने निघालेल्या गावापासून काही अंतरावरील मार्गावर अचानकपणे रानडुकरांचा कळप आडवा आल्याने झालेल्या अपघातात तिघेजण गंभीर जखमी झाले,तर एकजण किरकोळ जखमी झाल्याची...

सौर विद्युत कुंपण योजना ही शेतकऱ्यांच्या हिताचीच; उधळपट्टीचे आरोप निराधार- कृषी विभागाचे स्पष्टीकरण

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधीतून राबविण्यात येत असलेल्या सौर विद्युत कुंपण योजनेबाबत प्रसिद्ध झालेल्या बातम्यांतील आरोप वस्तुस्थितीला धरून नसून दिशाभूल करणारे आहेत.ही...

कोंढाळा येथे दोन दिवसांपासून बिबट्याची दहशत; दोन शेळ्यांचा पाडला फडशा..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):-गेल्या दोन दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घालत एकाच दिवशी दोन शेळ्यांचा फडशा पाडून दहशत माजवली आहे.बिबट्या एवढ्यावरच थांबला नाही,तर परत दुसऱ्या दिवशीही शिकारीच्या...

लाडक्या बहिणींना मोठा झटका; लाखो महिला अपात्र..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील अनेक कुटुंबांसाठी आधार देणारी व महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना देणारी महाराष्ट्र राज्यातील महायुती सरकारने जुलै-२०२४ पासून सुरू केलेली 'मुख्यमंत्री-माझी लाडकी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!