- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी ११ फेब्रुवारी रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी,पोलीस अधिकारी यांना दहावी,बारावी परीक्षेत होणाऱ्या कॉपीबाबत नवीन आदेश दिले आहेत.दहावी,बारावी परीक्षेत सामूहिक कॉपी करण्याचे प्रकार ज्या केंद्रावर उघडकीस येतील त्या केंद्राची मान्यता कायमस्वरूपी रद्द केली जावी.तसेच जे शिक्षक आणि कर्मचारी कॉपी करण्यासाठी मदत करतील त्यांना बडतर्फ करा,असे आदेश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.अशातच गडचिरोली जिल्ह्याच्या मुलचेरा तालुक्याच्या मुलचेरा शहरात सामूहिक कॉपी प्रकार उघडकीस आला आहे.प्रकरणी केंद्रप्रमुख व पर्यवेक्षकाला निलंबित करण्याचे आदेश शिक्षणाधिकाऱ्यांनी संस्थेला दिले.
राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सध्या बारावी बोर्डाच्या परीक्षा सुरू आहेत.१२ फेब्रुवारी रोजी हिंदी विषयाचा पेपर झाला.मुलचेरा येथील शहीद बाबूराव शेडमाके विद्यालय व ज्युनिअर कॉलेजच्या केंद्र क्रमांक-६३७ वर केंद्रप्रमुख म्हणून एस.वाय.पथारे तर पर्यवेक्षक एम.एम.खोब्रागडे कर्तव्यावर होते.पेपर सुरु असतांना शिक्षणाधिकारी (माध्यमिक) वासुदेव भुसे यांच्या पथकाने भेट दिली असता १८ पैकी १४ विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिकेवर पेन्सिलने उत्तरे लिहिलेली आढळली,तर काहींनी ही उत्तरे खोडलेली दिसून आले.सामूहिक कॉपीचा प्रकार निदर्शनास आल्यानंतर वासुदेव भुसे यांनी सविस्तर अहवाल शिक्षण मंडळाच्या नागपूर विभागीय सचिवांना पाठवला.त्यानंतर विभागीय सचिवांच्या सूचनेनुसार शिक्षणाधिकारी भुसे यांनी शिक्षण संस्थेला पत्र लिहून संबंधित केंद्रप्रमुख व पर्यवेक्षकांना निलंबित करण्याचे आदेश दिले.
शासनाकडून कॉपी बहाद्दर तसेच सहकार्य करणाऱ्यांवर कठोर करण्याचा निर्णय योग्य असल्याचे मानले जात आहे.जे विद्यार्थी रात्रंदिवस अभ्यास करून परीक्षा देतात,अश्यांना कमी टक्केवारी मिळून नैराश्याला सामोरे जावे लागते.तर जे विद्यार्थी अभ्यास न करता कॉपी करून पुढचे नंबर मारून वाहवाही मिळवित असतात.त्यामुळे कॉपी बहाद्दरांबद्दल घेतलेला निर्णय योग्यच असल्याचे बोलले जात आहे.
- Advertisement -

