Wednesday, June 24, 2026
Homeनागपूरन्यायाधीशांसमोरच वकिलाला हृदयविकाराचा झटका.. - न्यायालयात युक्तिवाद करताना हृदयविकाराने मृत्यू...

न्यायाधीशांसमोरच वकिलाला हृदयविकाराचा झटका.. – न्यायालयात युक्तिवाद करताना हृदयविकाराने मृत्यू…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-ॲड.तलत इक्बाल कुरैशी यांचा जिल्हा न्यायालयात युक्तिवाद करताना हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना काल,शनिवारी सकाळी ११:३० च्या सुमारास घडली.घटनेमुळे विधी क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.ॲड.कुरैशी यांचा एका दिवाणी प्रकरणावर जिल्हा न्यायाधीश एस.बी.पवार यांच्यासमक्ष युक्तिवाद सुरू होता.
दरम्यान,त्यांना हृदयविकाराचा जोरदार धक्का बसला व ते खाली कोसळले.ते पाहून न्या.पवार लगेच डायसवरून खाली उतरले.त्यांनी कुरैशी यांना पाणी पाजले व स्वतःच्या कारने सदर येथील रुग्णालयात खासगी नेले.
त्यांच्या पाठोपाठ जिल्हा वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड.रोशन बागडे व माजी अध्यक्ष ॲड.कमल सतुजा यांनीदेखील रुग्णालयात पोहोचून कुरैशी यांना तातडीने आवश्यक उपचार मिळण्यासाठी प्रयत्न केले, पण ते वाचू शकले नाहीत.कुरैशी हे प्रशांत कॉलनी, बोरगाव,गोरेवाडा रोड येथील रहिवासी होते; त्यांच्या पत्नीचे कोरोनामुळे निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात दोन मुली व बराच मोठा आप्त परिवार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाकडून दखल.. – तीन प्रगतशील शेतकऱ्यांना ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार’ जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील तीन प्रगतशील शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाने दखल घेत सन २०२३-२४ व २०२४-२५ या वर्षांसाठीचा प्रतिष्ठेचा 'वसंतराव नाईक शेतीनिष्ठ...

कर्जमाफीसाठी शेतकरी थेट बैलावर बसून पोहचला तहसील कार्यालयात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-राज्यातील शेतकरी बांधवांचे २ लाखापर्यंत कर्जमाफ करण्यात येणार आहे; पण शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेला नाही. कर्जमाफीबाबत प्रशासनाकडून वा संबंधित...

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-एसटी अर्थात राज्य परिवहन महामंडळाच्या  कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे ५३ टक्क्यांवरून ५८ टक्क्यांपर्यंत वाढविण्याची घोषणा आज,मंगळवार २३ जून रोजी...

नोंदणीकृत सर्व वृत्तपत्र व नियतकालिक प्रकाशकांनी निर्धारित मुदतीत वार्षिक विवरणपत्र सादर करण्याचे आवाहन.. – अन्यथा दहा हजाराचा दंड..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-प्रेस अँड रजिस्ट्रेशन ऑफ पिरिऑडिकल्स (पीआरपी)अधिनियम,२०२३ अंतर्गत नोंदणीकृत सर्व वृत्तपत्र व नियतकालिक प्रकाशकांनी आर्थिक वर्ष २०२४-२५ चे लेखापरीक्षित वार्षिक विवरणपत्र प्रेस...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!