Wednesday, September 2, 2026
Homeकोरचीखासदार नामदेव किरसान यांचा एक फोन अन् यंत्रणा लागली कामाला...

खासदार नामदेव किरसान यांचा एक फोन अन् यंत्रणा लागली कामाला…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

कोरची(गडचिरोली):-कुरखेडा-कोरची या राष्ट्रीय महमार्गावर नेहमीच अवजड वाहनांची वर्दळ असते. या वाहतुकीमुळे शहरालगतच मोठ-मोठे खड्डे निर्माण झाल्याने वाहने फसण्याचे प्रकार वाढले होते.त्यामुळे वाहतूकदारांना कमालीचा मनस्ताप सहन करावा लागत होता.याची माहिती प्राप्त होताच खा.नामदेव किरसान यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीवरुन खड्डे बुजविण्याच्या सूचना दिल्या. खासदारांच्या आदेशानंतर अखेर या राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे बुजविण्यात आल्याने सदर मार्गावरील प्रवास सुकर झाला आहे.कुरखेडा-कोरची राष्ट्रीय महामार्गावर चोवीस तास हलक्या तसेच जडवाहनांची वर्दळ असते.सद्यस्थितीत पावसाळ्याचे दिवस असून शहरातीलच ढाब्यानजीक अजवड वाहनांमुळे मोठ-मोठे खड्डे निर्माण झाले होते.यामुळे वाहने फसण्याचे प्रकार वाढीस आले.याचा फटका वाहन चालकांसह सर्वसामान्य नागरिकांनाही बसत होता.काही दिवसांपूर्वी संबंधित विभागामार्फत या खड्ड्यात माती टाकण्यात आली.त्यामुळे पुन्हा वाहने फसण्याचे प्रमाण वाढल्याने काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मनोज अग्रवाल यांनी खा.किरसान यांना दूरध्वनीद्वारे संपर्क करून माहिती दिली होती.त्यानुसार खासदार किरसान यांनी दखल घेतल्याने मार्गाची दुरुस्ती करण्यात आली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र कॉलम नसल्यास देशव्यापी आंदोलनाचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आगामी जनगणनेमध्ये इतर मागासवर्गीय(OBC)समाजाची स्वतंत्रपणे नोंद होण्यासाठी स्वतंत्र कॉलम उपलब्ध करून द्यावा,अशी मागणी ओबीसी समाज संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.यासंदर्भात संघटनेने देशाचे...

जिल्हा परिषद पदभरती; १९२ उमेदवारांची अंतिम प्रतीक्षा सूची जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत गट-क व गट-ड मधील रिक्त असलेली विविध संवर्गांची पदे अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांमधून शैक्षणिक अर्हता व...

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी ऑनलाईन प्रवेशिका आमंत्रित.. – हौशी मराठी,हिंदी,संगीत,संस्कृत तसेच बालनाट्य व दिव्यांग बाल नाट्य स्पर्धांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने १६ नोव्हेंबर २०२६ पासून सुरु होणाऱ्या हौशी मराठी,हिंदी,संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा...

फिरत असतांनाच हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-प्रकृती निरोगी राहण्यासाठी नियमित सकाळी फिरायला जाणे व जिम करणे,अशी दिनचर्या सुरू केलेली असतांनाच घराबाहेर पडलेल्या एका अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!