Sunday, April 19, 2026
Homeब्रम्हपुरीआज अड्याळ जाणी येथे विपश्यना केंद्राचे भूमीपूजन तसेच तथागत गौतम बुद्धांच्या मूर्तीचे...

आज अड्याळ जाणी येथे विपश्यना केंद्राचे भूमीपूजन तसेच तथागत गौतम बुद्धांच्या मूर्तीचे वितरण…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
ब्रम्हपुरी(चंद्रपूर) :- ब्रम्हपुरी तालुक्याच्या अड्याळ जाणी येथे विपश्यना केंद्राचे भूमीपूजन तसेच तथागत गौतम बुद्धांच्या मूर्तीचे वितरण आज,रविवारी १८ ऑगस्टला दुपारी १२ वाजता करण्यात येणार आहे.कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून थायलंड येथील वाट साकेत धम्म स्कूल रॉयल मठ पाली विभागाचे प्राध्यापक डॉ. फ्रामहा फॉगसाथोर्न धम्मभणी,पाली विभागाचे फ्रामाहा सुपाचै सुयानो यांची उपस्थिती राहणार आहे. मुख्य अतिथी म्हणून खा.वर्षा गायकवाड,खा.प्रणिती शिंदे,खा.बलवंत वानखेडे,खा.नामदेव किरसान,खा. शिवाजीराव काळगे,आ.विजय वडेट्टीवार खा.श्याम बर्वे,कॅप्टन नटिकेट थाईलंड,सिनेअभिनेता गगन मलिक,अनुसूचित जाती सेलचे प्रदेशाध्यक्ष सिध्दार्थ अंबीरे यांची उपस्थिती राहणार आहे.सकाळी १० ते १२ या वेळात सुप्रसिद्ध गायक अनिरुद्ध वनकर यांचा बुध्द-भीमगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.तरी या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे; असे आवाहन तालुका काँग्रेस कमिटीने केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विद्यार्थ्यांची सुरक्षितता महत्त्वाची; सर्व शैक्षणिक संस्था सकाळच्या सत्रात सुरू ठेवण्याचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-दिवसेंदिवस उष्णतेची तीव्रता वाढत असल्याने शाळा व महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.अश्यातच चंद्रपूर जिल्ह्यात उन्हाची...

चहा बनवण्यासाठी गॅस पेटवणार तितक्याच उडाला भडका; पतीचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-स्वयंपाकघरातील गॅस लिकेज असल्याने चहा बनवण्यासाठी गॅस पेटवणार तितक्याच आगीचा अचानकपणे भडका उडाला आणि काही क्षणातच सिलिंडरचा जोरदार स्फोट झाला.दरम्यान,संपूर्ण घरात...

वाहनधारकांसाठी दिलासा; गडचिरोली शहरातील ट्रॅफिक सिग्नल काही वेळासाठी राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विदर्भातीलच नव्हे तर राज्याच्या विविध जिल्ह्यात उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. सकाळपासूनच उन्हाची तीव्रता वाढत चालल्याने जीवाची लाहीलाही होत आहे.अश्यातच शहरातील महत्त्वाच्या...

उष्णतेची तीव्रता; प्रखर उन्हामुळे शेतातच पडली बेशुद्ध.. – शेतकरी महिलेचा मृत्यू; नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात उष्णतेचा पारा चढल्याने आरोग्य विभागासह प्रशासन सतर्क झाले आहे.त्यातच,नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करत आहे.विशेष म्हणजे,दुपारी १२...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!