Tuesday, July 28, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तप्रेम हे प्रेम असते; "प्रेमात आणि युद्धात कोणतेही नियम नसतात"... - बलात्कारात...

प्रेम हे प्रेम असते; “प्रेमात आणि युद्धात कोणतेही नियम नसतात”… – बलात्कारात शिक्षा झालेल्या व्यक्तीची निर्दोष मुक्तता..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-२०१४ मध्ये एका पुरुषावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या फिर्यादीला त्याच पुरुषाकडून दुसरे मूल झाले.मध्यस्थी प्रक्रियेदरम्यान हा प्रकार घडला.हा प्रकार उघडकीस आल्यानंतर मद्रास उच्च न्यायालयाने बलात्कारात शिक्षा झालेल्या व्यक्तीची निर्दोष मुक्तता केली. हायकोर्टाने निरीक्षण नोंदवले, “प्रेमात आणि युद्धात कोणतेही नियम नसतात.”
आरोपी आणि २१ वर्षीय महिला दूरचे नातेवाईक असून,ते शेजारी राहत होते.महिलेचे वडील वारले होते आणि ती तिच्या आजीसोबत राहत होती.
२० मे २०१२ रोजी आरोपीने पीडितेच्या घरात प्रवेश केला.तिच्यावर जबरदस्ती केली आणि धमकी देऊन बलात्कार केला.२०१४ मध्ये तिने मुलाला जन्म दिला. यानंतर तिने आरोपीविरुद्ध बलात्काराची तक्रार दाखल केली.२०१७ मध्ये जिल्हा महिला सत्र न्यायालय, कुड्डालोरने आरोपीला १० वर्षांची शिक्षा सुनावली.याला त्याने हायकोर्टात आव्हान दिले.
हायकोर्टाला महिलेच्या पोटी जन्मलेल्या मुलाच्या कल्याणाची चिंता वाटली.या चिंतेचे निराकरण करण्यासाठी,मुलाच्या भवितव्याबाबत तोडगा काढण्याच्या आशेने हे प्रकरण मध्यस्थीकडे हायकोर्टाने पाठवले.मध्यस्थीत तोडगा निघाला नाही. बलात्काराच्या आरोपातून आरोपींची निर्दोष मुक्तता करताना,हायकोर्टाने निरीक्षण नोंदवले की, “तक्रार, गुन्हा,खटला किंवा शिक्षा यापैकी काहीही आरोपी व फिर्यादीला वेगळे करू शकले नाही.”
न्यायमूर्ती एन.शेषशायी👇
महिला घटनेच्या वेळी प्रौढ होती.तिला माहीत होते किंवा किमान माहीत असले पाहिजे की ती कशात गुंतली आहे.तिने मूल होईपर्यंत कोणताही आरोप लावला नव्हता.त्यांनी अनेक वेळा शरीरसंबंध मान्य केले.ट्रायल कोर्टाने मात्र याकडे दुर्लक्ष केले.तरुण मुला मुलींनी त्यांच्या इच्छेनुसार जगण्याचा मार्ग निवडल्यास,देशाची घटना नैतिकतेचे विधान करत नाही.हे प्रकरण कदाचित ‘प्रेमात आणि युद्धात कोणतेही नियम नसतात’ या विधानाची साक्ष आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मुसळधार पावसाचा इशारा; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली/नागपूर :-भारतीय हवामान विभागाच्या नागपूर प्रादेशिक केंद्राने गडचिरोली जिल्ह्यासाठी उद्या,बुधवार २९ जुलै रोजी रेड अलर्ट तर ३० जुलै रोजी ऑरेंज अलर्ट जारी...

उद्यापासून राज्याच्या विविध भागात वाढणार पावसाचा जोर; नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या एका कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागांत उद्या,बुधवार २९ जुलै ते ३१ जुलैदरम्यान पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज...

पुलाचा कठडा तोडून कालव्यात कोसळली कार; एकाचा जागीच मृत्यू,तर तिघेजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-मुलगा व सुनेसोबत नातवाच्या भेटीसाठी गेलेल्या एका वृद्धेची नातवाची भेट ही अखेरची ठरल्याची घटना गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा-आमगाव मार्गावरील हरदोली गावाजवळील पुलाजवळ...

आता १० रुपये व २० रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार चलनात.. – जुन्या कागदी नोटा बंद होणार काय?

उद्रेक न्युज वृत्त :-कागदी नोटांचा वापर अनेक ठिकाणी केला जातो.विशेषतः भाजीपाला,प्रवास आणि दैनंदिन खरेदीत कागदी नोटांचा वापर सातत्याने होत असल्याने कागदी नोटा खूप लवकर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!