Tuesday, September 1, 2026
Homeगडचिरोलीनाट्यश्री कविता स्पर्धेतील तेहत्तिसाव्या सत्रात ब्रम्हपुरीच्या सोनाली (रायपुरे) सहारे विजयी....

नाट्यश्री कविता स्पर्धेतील तेहत्तिसाव्या सत्रात ब्रम्हपुरीच्या सोनाली (रायपुरे) सहारे विजयी….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-स्थानिक ‘नाट्यश्री साहित्य कला मंच, गडचिरोली’ च्या वतीने आठवड्यातील उत्कृष्ट कवी व कविता हा नविन उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे.त्यानुसार दर आठवड्याला ही स्पर्धा घेण्यात येते.या उपक्रमांतर्गत प्रत्येक कवींनी दर आठवड्याला कविता सादर करायची असून या कवितांमधून फक्त एका कवितेची निवड करण्यात येते.या कवितेला आठवड्याची उत्कृष्ट कविता व कवीला आठवड्याचे उत्कृष्ट कवी म्हणून पुरस्कृत करण्यात येते.
या उपक्रमाचे तेहत्तिसावे सत्र नुकतेच पार पडले असून यात ३० कवींनी सहभाग नोंदविला होता.या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून त्यात ब्रम्हपुरी (जि.चंद्रपूर)येथील कवयित्री सौ.सोनाली (रायपुरे)सहारे यांची आठवड्याचे उत्कृष्ट कवी व त्यांच्या “शब्द नि कविता” या कवितेची आठवड्याची उत्कृष्ट कविता म्हणून निवड करण्यात आली आहे.असे नाट्यश्रीचे संचालक तथा नाटककार चुडाराम बल्हारपुरे व कविता विभाग प्रमुख योगेश गोहणे यांनी कळविले आहे.
सौ.सोनाली (रायपुरे) सहारे हे ब्रम्हपुरी येथील रहिवासी असून प्रसिद्ध कवयित्री आहेत.त्यांचे ‘भावस्पर्श’ व ‘काव्यसृष्टी’ हे कवितासंग्रह, ‘मनतरंग’ चारोळीसंग्रह व ‘सुर्यविचार’ हा सुविचार संग्रह  प्रकाशित झालेला आहे.‌त्यांना सामाजिक कार्याची आवड असून विविध वृत्तपत्रांतून त्यांचे साहित्य नियमितपणे प्रकाशित होत असतात.विशेष म्हणजे त्या गडचिरोली जिल्ह्यातील माहेरवाशीण आहेत. त्यांच्या या यशाबद्दल नाट्यश्रीचे प्रा.‌अरुण बुरे,दादा चुधरी,दिलीप मेश्राम,प्रा.यादव गहाणे तसेच नाट्यश्री च्या सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
या तेहत्तिसाव्या सत्राच्या स्पर्धेत प्रामुख्याने प्रेमिला अलोने,जयराम धोंगडे, सौ.संगीता ठलाल,तुळशीराम उंदीरवाडे,वंदना सोरते,विलास टिकले,वामनदादा गेडाम,प्रिती ईश्वर चहांदे,राजेंद्र यादवराव सोनटक्के, रोहिणी पराडकर,गणेश रामदास निकम,मिलींद खोब्रागडे,रेखा दिक्षित,केवळराम बगमारे,वसंत चापले, उकंडराव राऊत,पी.डी.काटकर, संतोष कपाले, सोनाली रायपुरे)सहारे,मधुकर दुफारे,वकिल शेख, राजरत्न पेटकर,स्वप्नील बांबोळे,खुशाल म्हशाखेत्री, रंजना चुधरी,सुजाता अवचट,ज्योत्स्ना बन्सोड, कु. भावना रामटेके,मंदाकिनी चरडे इत्यादी कवींनी सहभाग नोंदविला होता.या पुरस्काराचे वितरण नाट्यश्रीच्या पुढील कार्यक्रमात करण्यात येणार असल्याचे नाट्यश्रीचे संचालक तथा नाटककार चुडाराम बल्हारपुरे यांनी कळविले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अनाथ बालकांना योजनांचा लाभ वेळेत देण्याचे जिल्ह्याधिकाऱ्यांचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात महिला व बालकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांपर्यंत त्यांचा लाभ वेळेत पोहोचवावा.बालविवाह व अल्पवयीन मातांशी...

आजपासून बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांसाठी ‘एनसीएमसी’ कार्ड अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या विविध सवलतधारक प्रवाशांसाठी आज,मंगळवार १ सप्टेंबर पासून 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' म्हणजेच संपर्करहित स्मार्ट कार्ड (एनसीएमसी)अनिवार्य करण्यात आले...

एकल महिला सर्वेक्षणात नाव न समाविष्ट झालेल्या महिलांना नाव नोंदविण्याची संधी- देसाईगंज नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतिश चौधरी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने देसाईगंज शहरातील एकल प्रकारातील महिलांचे सर्वेक्षण संबंधित वार्डातील महिला बचत गटांच्या सदस्यांच्या माध्यमातून...

सलग २४ तास हस्तलेखनाचा अनोखा राष्ट्रीय विक्रम.. चंद्रपूरच्या वैष्णवी मांडवकरची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंद..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-चंद्रपूरची गुणी कन्या वैष्णवी विश्र्वंभर मांडवकर हिने सलग २४ तास अखंड हस्तलेखन (Handwriting)करून 'सांगितिक वारसा आणि कौटुंबिक प्रवास' हे ८३ पानांचे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!