Monday, May 25, 2026
Homeगडचिरोली'नाट्यश्री' तर्फे पुस्तक प्रकाशन सोहळा व कविसंमेलनाचे आयोजन....- चुडाराम बल्हारपुरे लिखित "गोंडवानाचा...

‘नाट्यश्री’ तर्फे पुस्तक प्रकाशन सोहळा व कविसंमेलनाचे आयोजन….- चुडाराम बल्हारपुरे लिखित “गोंडवानाचा महायोध्दा-क्रांतिवीर बाबुराव शेडमाके” नाटकाच्या पुस्तकाचे प्रकाशन व लोकार्पण सोहळा येत्या २८ मे रोजी…. 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

संपादक/सत्यवान रामटेके

गडचिरोली :- स्थानिक ‘नाट्यश्री’ च्या वतीने झाडीपट्टीतील नाटककार “चुडाराम बल्हारपुरे” लिखित व मधुश्री प्रकाशन,पुणे प्रकाशित “गोंडवानाचा महायोध्दा- क्रांतिवीर बाबुराव शेडमाके” या नाटकाच्या पुस्तकाचे प्रकाशन व लोकार्पण येत्या २८ मे २०२३ ला झाडीपट्टीतील प्रसिद्ध ज्येष्ठ रंगकर्मी पद्मश्री डॉ. परशुराम खुणे यांचे हस्ते प्रा.विलास निंबोरकर यांचे घरी,परिश्रम निवास,आरमोरी रोड,गडचिरोली येथे संपन्न होत आहे.कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ रंगकर्मी व नाट्य समिक्षक प्राचार्य डॉ.श्याम मोहरकर राहणार असून प्रा.डॉ.जनबंधू,मेश्राम हे पुस्तकावर भाष्य करणार आहेत.तर प्रा.डॉ.राजकुमार मुसने हे नाट्य समीक्षण करणार आहेत.

विशेष अतिथी म्हणून प्राचार्य डॉ.राजाभाऊ मुनघाटे,  प्रा.डॉ.एस.एन.पठाण,प्रा.डॉ.प्रमोद मुनघाटे,प्रा.डॉ. धनराज खानोरकर,प्रा.सदानंद बोरकर (नाटककार) ,  प्रा.डॉ.नरेंद्र आरेकर,प्रा.शेखर डोंगरे (नाट्य कलावंत), प्रा.श्रीकांत कुतरमारे,अनिरुध्द वनकर (नाटककार व दिग्दर्शक),प्रा.डॉ.नरेश मडावी,प्रा.डॉ.माधव कांडणगीरे,प्रा.योगीराज नगराळे,प्रा.डॉ.सविता सादमवार व प्रसिद्ध आदिवासी साहित्यिका कुसूमताई आलाम उपस्थित राहणार आहेत.या प्रसंगी झाडीपट्टीतील संगीतकार विठ्ठल खानोरकर हे क्रांतीवीर बाबुराव शेडमाके या नाटकातील नाट्यगिते सादर करणार आहेत.या निमित्ताने झाडीपट्टीतील निवडक कविंचे कविसंमेलनही घेण्यात येणार असून चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील कवी सहभागी झालेले आहेत.  तरी या कार्यक्रमास जास्तीत जास्त कवी,  साहित्यिक व रसिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन नाट्यश्री चे दादा सुंदरकर,दादा चुधरी,दिलीप मेश्राम, प्रा.यादव गहाणे,योगेश गोहणे,प्रा.अरुण बुरे व सौ.कुंदा बल्हारपूरे यांनी केले आहे.

चुडाराम बल्हारपुरे हे झाडीपट्टीतील राज्य पुरस्कार प्राप्त नाटककार आहेत.त्यांना महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट वांड्.मय पुरस्कार प्राप्त झालेले आहे.आजपर्यंत त्यांची विविध ११ पुस्तके प्रकाशित झाली असून हे त्यांचे बारावे पुस्तक आहे.विविध स्तरावरील अनेक पुरस्काराने ते सन्मानीत आहेत.महामृत्युंजय मार्कंडेश्वर,बहूढंगी, समाधीवाले बाबा व धरती आबा-क्रांतीसुर्य बिरसा मुंडा ही त्यांची गाजलेली नाटके आहेत.नुकत्याच झालेल्या कंथेवाडी साहित्य संमेलनात त्यांच्या ” गोंडवानाचा महायोध्दा-क्रांतिवीर बाबुराव शेडमाके” या नाटकास “राज्य स्तरीय प्रेरणा साहित्य गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नागरिकांनो जीवाची काळजी घ्या; आजपासून नवतपाला सुरुवात.. – सर्वाधिक तापमानाचे नऊ दिवस..

उद्रेक न्युज वृत्त :-काही दिवसांपासून सूर्यदेवता विदर्भातील जीवसृष्टीवर कोपला की काय?अशी स्थिती निर्माण झाली आहे.सूर्य मोठ्या प्रमाणावर आग ओकू लागल्याने विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये उष्ण...

नागरिकांनी लोकशाही दिनात तक्रारी व निवेदने सादर करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन  येत्या,सोमवार १ जून २०२६ रोजी दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथील सभागृहात करण्यात आले आहे.जिल्ह्यातील नागरिकांनी...

देशात जनगणनेची प्रक्रिया सुरू झाली; पण ओबीसी समाजासाठी स्वतंत्र रकानाच नाही.. देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने उपविभागीय कार्यालयावर धडकणार ‘भव्य मोर्चा’..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):- "आमची संख्या,आमचा हक्क,आमचा सन्मान!" आणि "जनगणनेत स्वतंत्र कॉलम,आमचा हक्क!" अशी गगनभेदी गर्जना करत देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात...

रोजगार हमी योजनेच्या कायद्याची जागा घेणाऱ्या ‘व्हीबी-जी राम जी’ योजनेत १२५ दिवस काम देण्याची हमी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच कालावधीपासून सुरू असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना-२००५ कायद्याची जागा आता 'विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजिविका...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!