Tuesday, May 26, 2026
Homeमुंबईधावत्या ट्रेनमधून तोल गेला; एकाचा जागीच मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी...

धावत्या ट्रेनमधून तोल गेला; एकाचा जागीच मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाला..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-शहराच्या लोकल ट्रेनने लटकून प्रवास करणे दोन तरुणांच्या जीवावर बेतल्याची घटना उघडकीस आली आहे.काही महिन्यांपूर्वीच मध्य रेल्वेच्या मुंब्रा स्टेशन दरम्यान लोकल ट्रेनला लटकून प्रवास करणाऱ्या काही प्रवाशांचा मृत्यू झाला होता.सदरची घटना ताजी असतांनाच लोकल ट्रेनने लटकून प्रवास करणाऱ्या दोन तरुणांचा तोल जाऊन खाली कोसळताच एका तरुणाचा घटनास्थळीच मृत्यू झाला,तर एक तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना आज,गुरुवार २७ नोव्हेंबर रोजी सकाळच्या सुमारास वसई-नायगाव रेल्वे स्थानकाच्या मधोमध घडली.यात प्रतीश बाळाराम भोले याचा दुर्दैवी मृत्यू झाला,तर नानासाहेब मदने,असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.
आज सकाळच्या सुमारास विरार रेल्वे स्थानकातून सकाळी ९ वाजून १० मिनिटांनी चर्चगेटकडे एक लोकल ट्रेन रवाना झाली.या लोकल ट्रेनमधून प्रतीश बाळाराम भोले आणि नानासाहेब मदने हे दोघेही दरवाज्यात उभे राहून प्रवास करत होते.दरवाज्यात उभे असतांनाच धावत्या गाडीतून दोघांचाही तोल गेल्याने खाली कोसळले.यात एकजण मृत पावला,तर एकजण गंभीर जखमी झाला.घटना घडताच रेल्वे स्थानकावरील नागरिकांनी धाव घेत गंभीर जखमी तरुणास तात्काळ नजिकच्या रुग्णालयात दाखल केले.अपघातामुळे पश्चिम रेल्वेवरील वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच मृत तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविला. अपघात प्रकरणी पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर शेतकरी कर्जमाफीला निवडणूक आयोगाचा हिरवा कंदील..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बुधवार २० मे २०२६ रोजी शेतकरी कर्जमाफीवर मोठे भाष्य करून राज्यातील विधान परिषदेच्या निवडणुका जाहीर...

मोबाईलवर अचानक आलेल्या अलर्टने खळबळ.. – पुढील २४ तासांत पाच जिल्ह्यात तीव्र उष्णतेची लाट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नुकताच काही वेळापूर्वी अनेक नागरिकांच्या मोबाईलवर अचानकपणे "Extremely Severe Alert" म्हणून संदेश प्राप्त होताच एकच खळबळ उडाली.विशेष म्हणजे,सदरचा संदेश हा अत्यंत गंभीर...

येत्या सोमवारी होणारी लोकशाही दिन सभा रद्द..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन येत्या,सोमवार १ जून २०२६ रोजी दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथील सभागृहात करण्यात येणार होते.जिल्ह्यातील नागरिकांनी...

दोन चिमुकल्या मुलींवर अल्पवयीन मुलाचा अत्याचार..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यात दोन अल्पवयीन चिमुकल्या मुलींवर अत्याचार झाल्याची अत्यंत गंभीर आणि धक्कादायक घटना समोर आली आहे.या प्रकरणी अर्जुनी-मोरगाव पोलिसांनी तात्काळ...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!