Tuesday, September 1, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंज सिंधी समाज बांधवांकडून आपत्तीजनक वक्तव्याचा निषेध..!

देसाईगंज सिंधी समाज बांधवांकडून आपत्तीजनक वक्तव्याचा निषेध..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-छत्तीसगडच्या क्रांती सेनेचे प्रदेशाध्यक्ष अमित बघेल यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात सिंधी समाजाचे कुलदैवत भगवान झुलेलाल यांच्याबद्दल अश्लील आणि आक्षेपार्ह टिप्पणी बद्दल तसेच सिंधी समुदायाला केलेल्या आपत्तीजनक वक्तव्याच्या निषेधार्थ देसाईगंज संघर्ष समिती तथा सिंधी बांधवांच्या वतीने देसाईगंज उपविभागीय अधिकारी कार्यालयामार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य पोलिस प्रशासनास मंगळवारी निवेदन सादर करून सिंधी समाजाच्या भावना दुखावल्या प्रकरणी रायपूर येथील अमित बघेल यांच्यावर तात्काळ कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
अमित बघेल यांनी एका सार्वजनिक व्यासपीठावरून सिंधी समुदायाला “पाकिस्तानी” असे संबोधले आणि
समुदायाचे दैवत श्री झुलेलाल यांच्याबद्दल अनादरपूर्ण टिप्पणी केली होती.यामुळे समुदायाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या.अशा विधानांमुळे देशाचा सामाजिक सलोखा,धार्मिक एकता आणि शांततेला गंभीर धोका निर्माण होतो.शांतता,बंधुता आणि देशभक्तीवर विश्वास ठेवणारा सिंधी समुदाय कोणत्याही परिस्थितीत आपल्या धर्माचा आणि  देवतेचा अनादर सहन करणार नाही; असे समाज बांधवांनी म्हटले आहे.घटनेमुळे छत्तीसगडसह संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात सिंधी समुदायातून तीव्र संताप व्यक्त केला जातो आहे.भविष्यात धार्मिक आणि सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्या अशा कृती थांबवण्यासाठी अमित बघेल या व्यक्तीवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदन सादर करतांना देसाईगंज संघर्ष समितीचे अध्यक्ष भरत दयलानी,सिंधी समाजाचे ज्येष्ठ नागरिक लक्ष्मण खत्री,पंकज आहुजा,मनोज धामेजा,दीपक नागदवे,पंकज नागदवे सह समाज बांधव उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धक्कादायक..! जेवणाच्या डाळभाजीत पाल; ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डाळभाजीत पाल (विचगुर)पडल्याने तब्बल ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे जाणवू लागल्याची घटना आज,मंगळवार १ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या...

अनाथ बालकांना योजनांचा लाभ वेळेत देण्याचे जिल्ह्याधिकाऱ्यांचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात महिला व बालकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांपर्यंत त्यांचा लाभ वेळेत पोहोचवावा.बालविवाह व अल्पवयीन मातांशी...

आजपासून बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांसाठी ‘एनसीएमसी’ कार्ड अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या विविध सवलतधारक प्रवाशांसाठी आज,मंगळवार १ सप्टेंबर पासून 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' म्हणजेच संपर्करहित स्मार्ट कार्ड (एनसीएमसी)अनिवार्य करण्यात आले...

एकल महिला सर्वेक्षणात नाव न समाविष्ट झालेल्या महिलांना नाव नोंदविण्याची संधी- देसाईगंज नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतिश चौधरी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने देसाईगंज शहरातील एकल प्रकारातील महिलांचे सर्वेक्षण संबंधित वार्डातील महिला बचत गटांच्या सदस्यांच्या माध्यमातून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!