- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या माता वार्ड येथील श्री गजानन महाराज मंदिरात दरवर्षी प्रमाणे यंदाही श्री गजानन महाराज प्रगट दिनानिमित्य ‘श्रीमद् भागवत ज्ञानयज्ञ सप्ताह’ आज,गुरुवार १३ फेब्रुवारी पासून ते २० फेब्रुवारी पर्यंत आयोजित करण्यात आलेला आहे.त्यानिमित्ताने १३ फेब्रुवारी ते २० फेब्रुवारी पर्यंत हरी भक्त परायण ज्ञानेश्कन्या वैशालीताई इंगळे, रा.अमरावती यांचा संगितमय भागवत सप्ताहाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.तसेच येत्या सोमवार १७ फेब्रुवारीला दुपारी ३ वाजेच्या सुमारास शोभायात्रा व गुरुवार २० फेब्रुवारीला श्री गजानन महाराज प्रगट दिनानिमीत्य भागवत कथा समारोप, किर्तन,गोपालकाला व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.दरम्यानच्या काळात दररोज हरीपाठ,भारूड, श्रीकुष्ण शोभायात्रा व हवनाचा कार्यक्रम पार पडणार आहे.
सदर कार्यक्रमास गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.नामदेव किरसान,काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा आमदार नाना पटोले,आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम,माजी खासदार अशोक नेते,माजी आमदार कृष्णा गजबे,माजी आमदार आंनदराव गेडाम सह विविध मान्यवर उपस्थित असणार आहेत.
- Advertisement -

