Monday, July 27, 2026
Homeभंडारादुचाकीसह २७ वर्षीय तरुण कोसळला तलावात; तरुणाचा मृत्यू...

दुचाकीसह २७ वर्षीय तरुण कोसळला तलावात; तरुणाचा मृत्यू…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-दुचाकी अनियंत्रित होऊन दुचाकीसह तरुण तलावात कोसळला असल्याची घटना तुमसर तालुक्याच्या देव्हाडी येथील टिळक वॉर्डातील हनुमान तलावात काल,बुधवारी २३ ऑक्टोंबरच्या दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली.तलाव रस्त्याच्या अगदी शेजारी आहे.पोलिस प्रशासनाने तलावातून दुचाकी काढली.तर,सायंकाळी उशिरा तरुणाचा मृतदेह आढळला.ज्ञानेश्वर खराबे वय २७ वर्षे, परसवाडा, देव्हाडी असे मृताचे नाव आहे.घटना लक्षात येताच तलावाच्या काठावर बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.
ज्ञानेश्वर हा दुचाकी क्रमांक- एम.एच.३१ इ.सी. ९५४७ वरून परसवाडा येथे स्वगावी जात होता.अचानक भरधाव दुचाकी अनियंत्रित होऊन तो दुचाकीसह तुडुंब भरलेल्या तलावात कोसळला.त्यामुळे एकच खळबळ उडाली.तलावाशेजारी नागरिकांची घरे आहेत.नागरिक मदतीसाठी धावून आले.पाण्यात बुडालेली दुचाकी काढण्यात आली.ज्ञानेश्वरचा शोध स्थानिक नागरिकांनी घेतला.परंतु त्यांना यश आले नाही.देव्हाडीचे सरपंच आशिष टेंभुरकर तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन मदत कार्याला सुरुवात केली.
पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली.पोलिस घटनास्थळी दाखल झाले.पोलिसांनी गोताखोरांना पाचारण केले.घटनास्थळी तुमसरचे पोलिस निरीक्षक महादेव आचरेकर व पोलिसांचे पथक दाखल होऊन शोध मोहीम राबविण्यात आली.ज्ञानेश्वरची दुचाकी अनियंत्रित कशी झाली? रस्त्यावरून थेट तलावात तो कसा कोसळला? याचा तपास पोलिस करीत आहेत. हनुमान तलाव हा गावाच्या शेजारीच असून,तलावाच्या काठावरून रस्ता आहे.त्यामुळे सुरक्षितता लक्षात घेऊन तलावाला संरक्षक भिंत बांधण्याची गरज आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनीत १७ प्रशिक्षणार्थ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-कौशल्याधारित प्रशिक्षण हे केवळ रोजगार मिळविण्याचे साधन नसून युवकांना स्वावलंबी, आत्मविश्वासू आणि उद्योगक्षम बनविण्याचे प्रभावी माध्यम आहे.उद्योगांच्या गरजेनुसार दर्जेदार प्रशिक्षण घेतल्यास...

वाघोबाची दहशत; तब्बल दहा गावात ‘हाय अलर्ट’..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्याच्या सेलू,वर्धा व इतर तालुक्यातील परिसरात तीन वर्षे वयोगटातील तरुण नर वाघोबाची भ्रमंती सुरू असल्याने तब्बल दहा गावात वन विभागाच्या वतीने...

पुढील दोन दिवस पावसाचे; तर आज सात जिल्ह्यात वादळी पाऊस..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-पूर्वी उन्हाळा,पावसाळा व हिवाळा ठरलेल्या मोसमातील महिन्यांतच 'मी आलोय' म्हणायचा.मात्र, गेल्या काही कालावधीपासून नैसर्गिक चक्राच्या बदलांमुळे ऐन पावसाळ्यात पाऊस कधी पडणार...

तरुणाईचा धसका..! पेपरफुटीवर कठोरता आणण्यासाठी आज सादर होणार परीक्षा सुधारणा विधेयक..

उद्रेक न्युज वृत्त :-सध्या दिल्लीत संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असून देशभरातील विद्यार्थ्यांची नाराजी दूर करण्यासाठी केंद्र सरकारने शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासोबतच राष्ट्रीय परीक्षा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!