Monday, July 13, 2026
Homeचंद्रपूर..तर ताडोबात एकही जिप्सी आत जाऊ देणार नाही- खासदार प्रतिभा धानोरकर

..तर ताडोबात एकही जिप्सी आत जाऊ देणार नाही- खासदार प्रतिभा धानोरकर

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-येत्या १ ऑक्टोंबर पासून ताडोबाच्या गाभा क्षेत्रातील पर्यटनाची दारे खुली होत आहेत. मात्र, त्याचवेळी पर्यटकांना नव्या सफारी शुल्कासह या व्याघ्र प्रकल्पात प्रवेश घ्यावा लागणार आहे.नवे शुल्क आकारणीनुसार,ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर क्षेत्रात सोमवार ते शुक्रवार प्रवेश शुल्क ४ हजार ६०० रुपये,मार्गदर्शक शुल्क ७०० रुपये व वाहन शुल्क ३ हजार ३०० रुपये असे एकूण ८ हजार ६०० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहेत.तर शनिवार आणि रविवारी कोअर क्षेत्रात प्रवेश शुल्क ८ हजार ६०० रुपये,मार्गदर्शक शुल्क ७०० रुपये, वाहन शुल्क ३ हजार ३०० रुपये असे एकूण १२ हजार ६०० रुपये करण्यात आले आहे.
तर बफर क्षेत्रात सोमवार ते शुक्रवार प्रवेश शुल्क ३ हजार ६०० रुपये,मार्गदर्शक शुल्क ७०० रुपये व वाहन शुल्क ३ हजार रुपये असे एकूण ७ हजार ३०० रुपये आकारले जाणार आहे.तर शनिवार व रविवारी प्रवेश शुल्क ६ हजार ६०० रुपये,मार्गदर्शक शुल्क ७०० रुपये व वाहन शुल्क ३ हजार रुपये असे एकूण १० हजार ३०० रुपये आकारले जाणार आहे.
नव्या शुल्क आकारणीमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील पर्यटकांचे स्वप्न भंग होऊ शकते.सर्वसामान्य नागरिक एवढे मोठे शुल्क भरूच शकत नाही.त्यातच ज्या जिल्ह्यात प्रकल्प सुरू आहे; त्याच जिल्ह्यातील नागरिकांना मोठे शुल्क भरावे लागत असेल तर हे कदापिही सहन केले जाणार नाही.वाढीव शुल्क तात्काळ कमी केले नाही तर येत्या १ ऑक्टोंबरपासून तीव्र आंदोलन करू,पर्यटन हंगामापूर्वी स्थानिकांसाठी शुल्क कपातीचा निर्णय लागू झाला नाही,तर १ ऑक्टोंबर रोजी ताडोबात एकही जिप्सी आत जाऊ देणार नाही,असा इशारा वरोरा लोकसभा क्षेत्राच्या
खासदार प्रतिभा धानोरकर यांनी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांना पत्राद्वारे दिला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात मानव वन्यजीव संघर्ष वाढलेला आहे. वाघांच्या हल्ल्यांमुळे नागरिक जीव गमावत आहेत. अश्यातच वाघाचे दर्शन घेण्यासाठी हजारो रुपयांचे शुल्क आकारले जात आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांना ताडोबा सफारीसाठी केवळ २ हजार ७०० रूपये वाहन शुल्क व ६०० रूपये गाईड शुल्क आकारावे.या व्यतिरिक्त शुल्क आकारले गेले तर मोठा आंदोलन उभारण्यात येईल,त्याच बरोबर ताडोबात एकही जिप्सी आत जाऊ देणार नाही.असे खासदार प्रतिभा धानोरकर यांनी म्हटले आहे.यावर शासनाकडून निर्णायक मत झाल्यास येत्या काळात जिल्ह्यातील नागरिकांना कमी शुल्क आकारणीत सफरीचा आनंद लुटण्याची संधी उपलब्ध होऊ शकेल.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

केंद्रीय विद्यालयात इयत्ता पहिली ते पाचवीच्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली येथे नव्याने सुरू झालेल्या केंद्रीय विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता १ ली ते ५ वी मधील रिक्त जागांसाठी प्रवेश...

आता मार्केटमध्ये येणार दहा किलो वजनाचा गॅस सिलेंडर..

उद्रेक न्युज वृत्त:-बऱ्याच ठिकाणी जागेचा अभाव, वजनी सिलेंडर तसेच वजनानुसार वाढणारी रक्कम सर्वसामान्यांना न झेपावणारी असते.विशेषतः लहान व्यावसायिक,हॉटेल चालक आणि रस्त्यावरील विक्रेते. यासाठी सरकारी...

वाघ दिसताच पळत सुटले; जीव वाचवण्यासाठी धावत असतांनाच बंधाऱ्यात पडले,बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे.शेतावर गेलेले तिघेजण वाघ दिसताच जिकडे बनेल तिकडे धावत-पळत सुटले.पण जीव वाचवण्यासाठी बंधाऱ्यावरून...

पालकमंत्री साहेब..मक्याचे करायचे काय? पोळी खायला गहू द्या न..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात जुलै महिन्यापासून शासकीय स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थ्यांना मक्याचे वितरण केले जात आहे.दर महिन्याला तांदळासोबत १० ते १५ किलो मिळणारा गहू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!