- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना ‘भाऊबीज भेट’ म्हणून पुढील महिन्यात येणाऱ्या दिवाळीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सर्वांना प्रत्येकी दोन हजार रूपये देण्यात येणार असल्याची घोषणा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी त्यांच्या सोशल मीडियाच्या ‘एक्स'(ट्विटर) अकाऊंटवर दिली आहे.
मंत्री तटकरे यांनी म्हटले की,महाराष्ट्रातील बालकांच्या पोषणासाठी,महिलांच्या आरोग्यासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध योजना यशस्वीरीत्या अंमलात आणण्यासाठी अंगणवाडी सेविका व मदतनीस अतिशय समर्पित भावनेने सेवा देतात.या निस्सीम सेवेप्रती आदर व्यक्त करत दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीसांना “भाऊबीज भेट” देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे,यासाठी प्रत्येकी २००० रुपये याप्रमाणे एकूण ४०.६१ कोटी रुपये निधी तत्काळ मंजूर करण्यात आला असून अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना लवकरच भाऊबीज भेट रक्कम वितरित करण्यात येणार आहे.
- Advertisement -

