Thursday, June 25, 2026
Homeनागपूरडायल ११२ वर घरी बॉम्ब ठेवला असल्याचा केला फेक कॉल… अन् पोलिसांची...

डायल ११२ वर घरी बॉम्ब ठेवला असल्याचा केला फेक कॉल… अन् पोलिसांची उगीच झाली दमछाक..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

नागपूर :- स्वतःच्या घरी बॉम्ब ठेवला असून त्यामुळे धोका निर्माण झाल्याचा खोटा फोन पोलिसांना करणे एका व्यक्तीला महागात पडले.त्याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी असा प्रकार घडल्याने पोलिसांची चांगलीच धावपळ झाली.अंबाझरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

गणेश विठ्ठलराव पळसगावे वय ३९ वर्षे गोकुळपेठ असे आरोपीचे नाव आहे.४ जून रोजी रात्री डायल ११२ वर अज्ञात कॉलरचा फोन आला व त्याने त्याचे निवासस्थान असलेल्या अन्नपूर्णा इमारतीत बॉम्ब असल्याची माहिती दिली.ही माहिती अंबाझरी पोलिस ठाण्याला देण्यात आली.पोलिसांनी तेथे पोहोचून त्याला फोन केला असता त्याचा फोन बंद येत होता.

बॉम्बशोधक पथकाच्या मदतीने तेथे तपासणी करण्यात आली.मात्र, काहीही आक्षेपार्ह आढळले नाही.पोलिसांनी परिसरात चौकशी केली व संबंधित मोबाइल क्रमांक कुणाचा आहे ते विचारले.त्यावेळी तो पळसगावेचा क्रमांक असल्याची बाब समोर आली. त्याच्या घरी जाऊन पोलिसांनी शोध घेतला असता तो घरात लपलेला आढळला,त्याने सीम कार्ड मोबाइलमधून बाहेर काढले होते.त्याला पोलिसांनी विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.त्याला ताब्यात घेण्यात आले व त्याच्याविरोधात अंबाझरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.या फेक कॉलमुळे पोलिसांची उगाच दमछाक झाली.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आकांक्षित जिल्हा कामगिरीत गडचिरोली देशात ‘टॉप टेन’ मध्ये..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-केंद्र सरकारच्या 'आकांक्षित जिल्हा' मोहिमेतंर्गत उत्कृष्ट कामगिरी करत गडचिरोली जिल्ह्याने देशभरातील ११२ आकांक्षित जिल्ह्यांच्या यादीत पहिले १० मध्ये स्थान पटकावले आहे....

महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठी कर्जमुक्ती योजना; कर्जमुक्ती योजनेबाबत वाचा संपूर्ण माहिती.. – कोण पात्र आणि कोण असणार अपात्र..

उद्रेक न्युज वृत्त :-शेतकरी बांधव राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहेत.अनियमित पाऊस, गारपीट,दुष्काळ,अतिवृष्टी व महापूर यांसारख्या नैसर्गिक संकटांमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी...

बहिणीचा छळ असह्य; जावयाचा साळ्यानेच केला खून.. – ५० हजाराची दिली सुपारी..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-गेल्या सहा वर्षापासून बहिणीचा छळ करीत असल्याच्या रागातून ५० हजाराची सुपारी देत चक्क साळ्यानेच जावयाचा गेम बजावला असल्याची धक्कादायक बाब पोलीस तपासात...

सावधान..! जिल्हा परिषद शाळांतील परिचर भरतीची सोशल मीडियावरील जाहिरात बनावट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-सोशल मीडियावर जिल्हा परिषद शाळांमध्ये परिचर(Peon)पदभरतीसंदर्भात प्रसारित होत असलेली जाहिरात पूर्णपणे खोटी,बनावट आणि दिशाभूल करणारी असल्याचा अधिकृत खुलासा जिल्हा परिषदेचे मुख्य...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!