Thursday, June 25, 2026
Homeगडचिरोलीअबब..! अन् लीपिकांनीच १ कोटी ४६ लाखावर मारला डल्ला…-कधी १० हजार तर...

अबब..! अन् लीपिकांनीच १ कोटी ४६ लाखावर मारला डल्ला…-कधी १० हजार तर कधी १५ हजार रुपये काढण्याचा प्रकार होता सुरू…-गडचिरोली गोंडवाना विद्यापीठातील प्रकरण..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- गडचिरोली जिल्हा हा आदिवासी बहुल,नक्षल प्रभावित मागास म्हणून ओळखला जातो.जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची सोय व्हावी; यासाठी गडचिरोलीत गोंडवाना विद्यापीठाची निर्मिती करण्यात आली.मागील काही वर्षांच्या कालावधीत विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या विकासासाठी विविध उपक्रम राबवून आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.गोंडवाना विद्यापीठात विकास कामे करण्यासाठी आणि विविध उपक्रम राबविण्यासाठी विद्यापीठाचे एक स्वतंत्र बँक खाते आहे.ज्याद्वारे विविध व्यवहार केले जातात.अशातच नुकतेच विद्यापीठाच्या मुख्य बँक खात्यातून १.४६ कोटी रुपये हडप केल्याचे प्रकरण उघडकीस आल्याने विद्यापीठ प्रशासनासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. गोंडवाना विद्यापीठाच्या बँक खात्यातून कोट्यवधी रुपये हडप झाल्याची बाब उघडकीस येताच; विद्यापीठ प्रशासनाने याची गंभीरतेने चौकशी केली असता,पैसे हडप करणारे विद्यापीठातीलच लिपीक पदावर कार्यरत कर्मचारी असल्याचे निदर्शनास आले.ही बाब स्पष्ट होताच विद्यापीठाचे वित्त व लेखाधिकारी भास्कर पठारे यांनी मंगळवारी सायंकाळी गडचिरोली पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.पोलिसांनी तक्रार दाखल होताच,गुन्हा दाखल करून महेशकुमार उसेंडी,अमोल रंगारी,अमित जांभुळे व प्रिया पगाडे या चारही कर्मचाऱ्यांना अटक केली आहे.या प्रकरणामुळे विद्यापीठ प्रशासनासह संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे.गोंडवाना विद्यापीठात लिपीक पदावर कार्यरत संबंधित कर्मचाऱ्यांद्वारे मागील दोन वर्षांपासून विद्यापीठाच्या मुख्य बँक खात्यातून पैसे काढले जात होते.कर्मचा-यांनी कधी १० हजार तर कधी १५ हजार रुपये काढले.आतापर्यंत १ कोटी ४६ लाख रुपये हडप केले.या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यानंतर विद्यापीठाने गडचिरोली पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली.

डॉ.प्रशांत बोकारे, कुलगुरु, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली👇

विद्यापीठाच्या वित्त लेखाधिकाऱ्यांनी खात्याची चौकशी सुरू केली असता,संबंधित कर्मचाऱ्यांनी फाइल देण्यास टाळाटाळ करून विलंब केला.त्यामुळे शंका निर्माण झाली.मागील शुक्रवारी रात्री संबंधित अधिकाऱ्याने मला फोन केला.त्यानंतर संबंधित अधिकाऱ्याला फाइल तपासण्याचे आदेश दिले.या संदर्भात रविवारी बैठक घेण्यात आली.सोमवारी वित्त समितीची बैठक घेतली.ज्यामध्ये या प्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार करण्याचा निर्णय घेण्यात आला. मंगळवारी गडचिरोली पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आकांक्षित जिल्हा कामगिरीत गडचिरोली देशात ‘टॉप टेन’ मध्ये..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-केंद्र सरकारच्या 'आकांक्षित जिल्हा' मोहिमेतंर्गत उत्कृष्ट कामगिरी करत गडचिरोली जिल्ह्याने देशभरातील ११२ आकांक्षित जिल्ह्यांच्या यादीत पहिले १० मध्ये स्थान पटकावले आहे....

महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठी कर्जमुक्ती योजना; कर्जमुक्ती योजनेबाबत वाचा संपूर्ण माहिती.. – कोण पात्र आणि कोण असणार अपात्र..

उद्रेक न्युज वृत्त :-शेतकरी बांधव राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहेत.अनियमित पाऊस, गारपीट,दुष्काळ,अतिवृष्टी व महापूर यांसारख्या नैसर्गिक संकटांमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी...

बहिणीचा छळ असह्य; जावयाचा साळ्यानेच केला खून.. – ५० हजाराची दिली सुपारी..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-गेल्या सहा वर्षापासून बहिणीचा छळ करीत असल्याच्या रागातून ५० हजाराची सुपारी देत चक्क साळ्यानेच जावयाचा गेम बजावला असल्याची धक्कादायक बाब पोलीस तपासात...

सावधान..! जिल्हा परिषद शाळांतील परिचर भरतीची सोशल मीडियावरील जाहिरात बनावट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-सोशल मीडियावर जिल्हा परिषद शाळांमध्ये परिचर(Peon)पदभरतीसंदर्भात प्रसारित होत असलेली जाहिरात पूर्णपणे खोटी,बनावट आणि दिशाभूल करणारी असल्याचा अधिकृत खुलासा जिल्हा परिषदेचे मुख्य...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!