Wednesday, September 23, 2026
Homeनागपूरडबा पार्टी करण्यासाठी गेलेल्या तिघांचा तलावात बुडून मृत्यू…

डबा पार्टी करण्यासाठी गेलेल्या तिघांचा तलावात बुडून मृत्यू…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

नागपूर :- राज्यात गेल्या काही दिवसांपासून विविध भागात बुडून मृत्यू झाल्याच्या घटना वारंवार उघडकीस येत आहेत.काही दिवसांपूर्वीच अहमदनगरमध्ये बुडलेल्या तरुणांचा शोध घेण्यासाठी निघालेली एसडीआरएफच्या (SDRF) जवानांची बोट उलटून मोठी दुर्घटना घडली होती.यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला होता.त्यानंतर वेंगुर्ले बंदरातही बोल उलटून चार जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते.अशा घटना ज्वलंत असतानाच नागपुरमध्येही अशीच धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे.

नागपुरमधील उमरेड तालुक्यतील कुही पोलीस स्टेशन अंतर्गत मटकाझरी तलावात बुडून तिघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.यामध्ये एक लहान मुलगा आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. या दुर्दैवी घटनेने मृतांच्या कुटुंबियांना धक्का बसला असून परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,नागपुरच्या वाठोडा परिसरातील तिघेजण काल,गुरुवारी दुपारच्या सुमारास डबा पार्टी करण्यासाठी मटकाझरी तलावाजवळ गेले होते.पार्टीदरम्यान,हे तिघेही तलावात बुडाले.आज सकाळी या तिघांचे मृतदेह सापडले असता याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.दरम्यान,डबा पार्टी जीवावर बेतल्यामुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बदलते हवामान; पाऊस घालणार थैमान..!

उद्रेक न्युज वृत्त :-सध्या हवामान बदलाचे संकेत असल्याने विदर्भातील नागपूर,यवतमाळ,चंद्रपूर, गोंदिया,भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यांसह मुंबई मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचा जोर वाढणार आहे.हवामान विभागाच्या...

उच्च न्यायालयाचा दणका; अतिदुर्गम भागात दुचाकीने पोहोचले जिल्हाधिकारी व अधिकारी..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम लष्कर,गोपणार,मुरडपार,हॅलोदंडी आणि धिरंगी या गावांच्या मूलभूत विकासाला प्राधान्य देऊन विविध विभागांच्या लोककल्याणकारी व विकास योजनांचा लाभ जास्तीत...

बँकेची कामे असतील तर लवकर उरकून घ्या; सलग ५ दिवस बँकिंग सेवा राहणार ठप्प..!

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स(यूएफबीआय)या बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या संयुक्त संघटनेने विविध मागण्यांसाठी शुक्रवार ११ सप्टेंबर २०२६ रोजी एक दिवसीय देशव्यापी...

देसाईगंज आदर्श महाविद्यालयात क्रांतीवीर बाबुराव शेडमाके ‘कमवा व शिका’ योजनेबाबत मार्गदर्शन.. -योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या गरजू व होतकरू ४० विद्यार्थ्यांची निवड..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देसाईगंज येथील विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या क्रांतीवीर बाबुराव शेडमाके ‘कमवा व शिका’ योजनेअंतर्गत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!