Saturday, September 5, 2026
Homeदेसाईगंजचोप-कोंढाळा ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका मेघना राऊत आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने सन्मानित..

चोप-कोंढाळा ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका मेघना राऊत आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने सन्मानित..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या चोप येथील स्थायी तर कोंढाळा ग्रामपंचायतीचे अतिरिक्त पदभार असणाऱ्या ग्रामसेविका मेघना संजय राऊत यांना काल,रविवार ९ मार्च रोजी गडचिरोली नियोजन भवनात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे,उपमुख्य कार्यकारी अधिकारी तसेच उपस्थित विविध मान्यवरांच्या हस्ते सन २०२३-२४ या वर्षातील आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
गडचिरोली जिल्हा परिषदेकडून दिला जाणारा ग्रामसेवक पुरस्कार हा ग्रामीण भागात विकासासाठी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामसेवक यांना दरवर्षी दिला जातो.अशातच ग्रामसेविका मेघना राऊत यांनी ग्रामपंचायत चोप या ठिकाणी विविध उपक्रम राबवून सन २०२०-२१ मध्ये सुंदरग्राम(स्मार्टग्राम) अभियानाच्या माध्यमातून तालुका स्तरीय तसेच जिल्हा स्तरीय प्रथम पुरस्कार मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली.त्याचप्रमाणे सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात जिल्हा स्तरीय ग्राम स्वच्छता अभियनांतर्गत चोप ग्रामपंचायतीस प्रथम पुरस्काराने गौरविण्यात आले.तसेच राऊत यांनी कोंढाळा ग्रामपंचायतीस सन २०२२-२३ मध्ये ग्राम स्वच्छता अभियनांतर्गत जिल्हा स्तरीय द्वितीय पुरस्कार प्राप्त करून दिला आहे.ग्रामसेविका मेघना राऊत यांनी ग्रामीण भागात शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी यशस्वीपणे राबवून ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेचे राहणीमान उंचावण्यासाठी व आलेल्या अडचणी सोडवण्यासाठी नेहमी तत्पर असतात.त्यातच चोप व कोंढाळा या दोन्ही ग्रामपंचायती लोकसंख्येच्या दृष्टीने मोठ्या असल्याने यातील जबाबदारी सांभाळणे जिकिरीचे आहे.अशातच दोन्ही गावातील राजकीय समीकरणे सांभाळणे अवघड आहे.अशातही ग्रामसेविका मेघना राऊत ह्या न डगमगता उत्कृष्टरित्या कार्य पार पाडून जबाबदारी सांभाळीत आहेत.त्यामुळे राऊत यांना सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात प्रयत्नांना यश म्हणून आदर्श ग्रामसेवक पुरस्कार कुटुंबासमवेत उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.पुरस्कार प्रदान करतेवेळी त्यांच्या समवेत आई-वडील, देसाईगंज पंचायत समितीचे गट विकास अधिकारी प्रणाली खोचरे,पंचायत समितीचे विस्तार अधिकारी काळबांधे, सेवा निवृत्त पंचायत विस्तार अधिकारी चिलबुले सह विविध मान्यवर उपस्थित होते.पुरस्काराचे श्रेय त्यांनी दोन्ही ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच,सदस्य,ग्रामस्थ, ग्रामपंचायत कर्मचारी वृंद तथा आई-वडिलांना दिले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता दुर्गम व आदिवासीबहुल भागातील बालकांच्या पोषण-संगोपनासाठी ४५ पाळणाघरे.. – आज पहिल्या पाळणाघराचे उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल भागातील तीन वर्षांखालील बालकांना योग्य पोषण, आरोग्य,सुरक्षित संगोपन आणि प्रारंभिक बालविकासाच्या सुविधा गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात...

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

जमिनीच्या वाढीव मोबदल्यावरून वाद; एसडीओच्या खुर्चीसह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-शासनाने जमीन घेतली खरी,पण त्याचा योग्य वाढीव मोबदला दिला गेला नसल्याने याविरोधात कोर्टात आव्हान देण्यात आले.ज्यांची जमीन गेली,त्यांच्या बाजूने कोर्टात निर्णय लागला....

देसाईगंज शहरात खळबळ; महिला दारू विक्रेती चार जिल्ह्यांच्या सीमेबाहेर एक वर्षासाठी तडीपार..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यात १९९२ पासून दारूबंदी आहे.तरीही गेल्या काही महिन्यांत लाखो रुपयांचा दारूसाठा व मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून नष्ट केल्याने जिल्ह्यात दारूबंदीचा बुरखा टराटरा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!