Friday, May 1, 2026
Homeगडचिरोलीचनकाईनगरात तान्हा पोळा उत्साहात साजरा.. - भाजपा शहर महामंत्री निखिल चरडे व...

चनकाईनगरात तान्हा पोळा उत्साहात साजरा.. – भाजपा शहर महामंत्री निखिल चरडे व मान्यवरांच्या हस्ते बालगोपालांना वैयक्तिक बक्षीसांचे वितरण..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-शहरातील चनकाईनगर येथे एकता गणेश मंडळातर्फे आयोजित तान्हा पोळा दरवर्षी प्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.चनकाईनगर येथे काल शनिवारी सकाळच्या सुमारास तान्हा पोळा दिनाचे औचित्य साधून नंदिबैल सजवून बालगोपाल एकत्र गोळा झाले. चंद्रयान,शेतकरी आत्महत्या, भ्रष्टाचार, कचरा व्यवस्थापन,कालीमाता,वाढते अपघात या विषयावरील प्रतिकृतींनी महोत्सव मनमोहक ठरले. कार्यक्रमाची सुरूवात हर हर महादेव च्या गजरात पुजन करुन आरती करण्यात आली.नंदिबैलांचे निरिक्षण करुन प्रत्येक बालगोपालांना एकता गणेश मंडळाच्या मान्यवरांकडून बक्षीस वितरण करण्यात आले.यात प्रोत्साहनपर बैल सजावट, थिम, स्लोगन,ट्रॅफिक पोलिस,उत्कृष्ट वेशभूषा करणाऱ्या चिमुकल्यांना बक्षिसे प्रदान करण्यात आली.प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या राजलक्ष्मी पतरंगे हिला गडचिरोली भाजपा शहर महामंत्री निखिल चरडे यांच्या हस्ते सायकलचे वितरण करण्यात आले.तर द्वितीय क्रमांक पटकावणाऱ्या स्वरांग आकेवार याला  विजय गोरडवार यांच्याही हस्ते सायकल देण्यात आली. तसेच तृतीय बक्षीस अन्ती कुंभारे,मोहित नवलाखे यांना प्रफुल आंबेडकर यांच्या हस्ते प्रोत्साहनपर सायकल,तर चतुर्थ बक्षीस संकेत भांडेकर यास भाजपा शहर महामंत्री सागर सोनटक्के यांच्या हस्ते सायकल देण्यात आली.प्रसंगी चनकाईनगर येथील आयोजक एकता गणेश मंडळाचे निखिल चरडे,विजय गोरडवार, प्रफुल आंबोरकर,सागर सोनटक्के,विजय कुनघाडकर, सदाशिव नैताम,आशिष सातपुते, शुभम,पून्नमवार,अजय भांडेकर,सागल तुपट सह आबालवृद्ध तथा शहरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

माय-लेकीने राहत्या घरीच घेतला गळफास..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बाळ जन्माला येताच मृत पावल्याने धक्क्यातून सावरण्यासाठी आईकडे राहायला गेलेल्या मुलीने आणि तिच्या आईने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना...

मोठा अनर्थ टळला; चक्क धावत्या बसचे चाक निघाल्याने प्रवाशांमध्ये खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कधीकाळी धावती बस अचानकपणे बंद पडते, तर कधी गाडीच्या वरचा छप्परच उडून जातो.पावसात तर काही बसेसमध्ये चक्क छतावरून पाणी गळायला लागतो.अश्या...

हॉटेलचा नाश्ता महागणार; व्यवसायिक सिलेंडरच्या दरात सर्वात मोठी वाढ.. – सर्वसामान्यांच्याच खिशाला कात्री..

उद्रेक न्युज वृत्त :-महिन्याच्या सुरुवातीलाच कमर्शियल म्हणजेच व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे.आज,शुक्रवार १ मे रोजी १९ किलोच्या व्यवसायिक सिलेंडरच्या किंमतीत...

उद्याला बारावीचा ऑनलाइन निकाल..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा निकाल कधी लागणार,याची उत्सुकता असतांनाच राज्य बोर्डाने काल गुरुवारच्या रात्री परिपत्रक काढत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!