Tuesday, September 1, 2026
Homeमुंबईआदिवासी कुटुंबांचे उत्पन्न वाढ व जीवनमान उंचावण्यासाठी ‘मॉयल लिमिटेड’ च्या महत्वपूर्ण योगदानातून...

आदिवासी कुटुंबांचे उत्पन्न वाढ व जीवनमान उंचावण्यासाठी ‘मॉयल लिमिटेड’ च्या महत्वपूर्ण योगदानातून अनेक उपक्रम- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस -गडचिरोली,नागपूर व भंडारा जिल्ह्यांमध्ये वैविध्यपूर्ण विकास प्रकल्प..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई/गडचिरोली :- “आदिवासी समुदायाचे जीवनमान उंचावणे व त्यांच्या जीवनात शाश्वत विकास घडवून आणण्यासाठी सार्वजनिक आणि सामाजिक क्षेत्राचा सहभाग आहे.यातून कृषी आधारित वैविध्यपूर्ण योजना राबवल्या जात असून या विकासासाठी ‘मॉयल लिमिटेड’ चे योगदान महत्वपूर्ण आहे,” असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.केंद्र सरकारच्या अंगीकृत मिनीरत्न ‘मॉयल लिमिटेड’ या सार्वजनिक उपक्रमाच्या वतीने विविध जिल्ह्यांमधील आदिवासी कुटुंबांचे उत्पन्न वाढ व जीवनमान उंचावण्यासाठी अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत.मुख्यमंत्री फडणवीस यांनी या योगदानासाठी ‘मॉयल लिमिटेड’ चे अभिनंदन केले. “नीती आयोगाने (NITI Aayog) देशातील निवडक आकांक्षी जिल्ह्यांमध्ये गडचिरोलीचा समावेश केला आहे.स्वयंसेवी संस्थाचा सहभाग व ‘मॉयल लिमिटेड’ च्या योगदानातून विविध जिल्ह्यातील आदिवासी समुदायासाठी शाश्वत परिणामकारक उपाययोजना राबविण्यात येतील.यात सहभागी सामाजिक क्षेत्रातील जलसंवर्धन,कृषी व वन आधारित उपजीविका या क्षेत्रात बायफ संस्थेचे विकासात्मक दीर्घकालीन कार्य चांगले आहे,”असे याप्रसंगी त्यांनी नमूद केले.
‘मॉयल लिमिटेड’ने आदिवासी क्षेत्रातील सामाजिक कामासाठी “बायफ इन्स्टिटयूट फॉर सस्टेनेबल लाइव्हवूड्स अँड  डेव्हलपमेंट (बीआयएसएलडी )” स्वयंसेवी संस्थेची निवड करत निधी उपलब्ध करून दिला आहे.ही संस्था राबवत असलेल्या उपक्रमांतून गडचिरोली जिल्ह्यातील १८ हजार कुटुंबांना आधार देण्यासाठी उपजीविकेशी संबंधित विविध उपक्रम राबवले जात आहेत.या उपक्रमांमुळे अनेक ग्रामीण कुटुंबांसाठी शाश्वत उपजीविका आणि जीवनमानात सुधार होईल.तसेच ‘मॉयल लिमिटेड’ या सार्वजनिक उपक्रमाकडून मंजूर निधीतून मार्च २०२८ पर्यंत नागपूर व भंडारा जिल्ह्यातील ४ हजार कुटुंबांच्या उत्पन्न वाढीसाठी व जीवनमान उंचावण्यासाठी  विविध योजना राबवल्या जाणार आहेत,पारंपरिक बोडी-आधारित शेती प्रणाली,जलसंपदा विकास आणि महिला सक्षमीकरण कार्यक्रमांचे एकत्रीकरण करून समुदाय-आधारित उपजीविकेला प्रोत्साहन दिले जात आहेत,असे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले. मुख्यमंत्र्यांना या उपक्रमांसंदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली.याबरोबर शासनाचे विविध विभाग व  स्वयंसेवी संस्थामार्फत संयुक्त सहकार्याने जिल्ह्यात कृषी,वन उत्पादने,ग्रामीण उत्पादने,पायाभूत सुविधा व व्यवस्थापन सुविधा यांचा विकास साधला जाणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

एकल महिला सर्वेक्षणात नाव न समाविष्ट झालेल्या महिलांना नाव नोंदविण्याची संधी- देसाईगंज नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतिश चौधरी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने देसाईगंज शहरातील एकल प्रकारातील महिलांचे सर्वेक्षण संबंधित वार्डातील महिला बचत गटांच्या सदस्यांच्या माध्यमातून...

सलग २४ तास हस्तलेखनाचा अनोखा राष्ट्रीय विक्रम.. चंद्रपूरच्या वैष्णवी मांडवकरची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंद..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-चंद्रपूरची गुणी कन्या वैष्णवी विश्र्वंभर मांडवकर हिने सलग २४ तास अखंड हस्तलेखन (Handwriting)करून 'सांगितिक वारसा आणि कौटुंबिक प्रवास' हे ८३ पानांचे...

खत उत्पादक कंपनी अथवा विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना गरज नसलेल्या निविष्ठांची खरेदी करण्याची सक्ती करू नये- कृषी विभाग -सक्ती अथवा जादा दराने विक्रीबाबत तक्रार नोंदविण्याचे...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर रास्त दरात आणि पुरेशा प्रमाणात खते व निविष्ठा उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाकडून नियमित नियंत्रण व तपासणी करण्यात...

पॅकेजिंगचा झोल; एक्सपायरी डेट बदलून पुन्हा बाजारात विकणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश.. -तब्बल ७५ लाखांहून अधिक किंमतीचा मुदतबाह्य साठा जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दुकानात पॉकीटामध्ये मिळणारे विविध अन्न पदार्थ चवदार म्हणून आपण मोठ्या आवडीने खात असतो.प्रत्येक पॉकीटांवर सुरक्षित अन्नपदार्थांच्या चविंसाठी विशिष्ट कालमर्यादा नमूद केलेली...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!