Wednesday, July 29, 2026
Homeचंद्रपूरग्रामपंचायतीत रोजंदारी मजूर असलेल्या तरुणाने घेतला गळफास..

ग्रामपंचायतीत रोजंदारी मजूर असलेल्या तरुणाने घेतला गळफास..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-आई शेतीच्या कामासाठी शिवारात गेली. पत्नीने पतीला जेवण वाढून मुलीला अंगणवाडीत गेल्याचे पाहून विवाहित युवकाने पाळण्याच्या दोरीने घरीच गळफास घेतला असल्याची घटना काल, शुक्रवारी २२ नोव्हेंबरच्या दुपारी १२:१५ वाजता बल्लारपूर तालुक्यातील विसापूर (वस्ती) येथे घडली.
पवन दिवाकर थेरे वय २८ वर्षे,रा.विसापूर असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.दिवाकर थेरे हा ग्रामपंचायतीत रोजंदारी मजूर म्हणून कामाला होता.यामुळे पत्नी कालेश्वरी व दोन लहान मुलींचे संगोपन करण्यात अडचण येत होती; अशी नागरिकांत चर्चा आहे.काल शुक्रवारी मृतकाची आई नेहमीप्रमाणे शेतीच्या कामाला गेली.वडील गोठ्यातील जनावरांना पाणी देण्यासाठी गेले. पत्नीने मुलीला अंगणवाडीत सोडण्यापूर्वी पवनला जेवण वाढले.जेवण करत असतांना ती अंगणवाडीत गेली.दरम्यान,त्याने पाळण्याच्या दोरीने गळफास घेतला.त्याच्या पश्चात आई-वडील,पत्नी,दोन चिमुकल्या मुली व मोठा आप्त परिवार आहे.सदर घटनेचा पुढील तपास पीएसआय संतोष एनगंधेवार यांच्या नेतृत्वात जमादार जीवन पाल,विजय वैद्य करीत आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जिल्हा कारागृहात कैद्यांची आरोग्य तपासणी व लसीकरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जागतिक हेपाटायटिस दिनानिमित्त जिल्हा सामान्य रुग्णालय,गडचिरोली यांच्या राष्ट्रीय विषाणूजन्य यकृतदाह नियंत्रण कार्यक्रम(NVHCP) अंतर्गत जिल्हा खुले कारागृह,गडचिरोली येथे आरोग्य जनजागृती, वैद्यकीय तपासणी...

मुसळधार पावसाचा इशारा; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली/नागपूर :-भारतीय हवामान विभागाच्या नागपूर प्रादेशिक केंद्राने गडचिरोली जिल्ह्यासाठी उद्या,बुधवार २९ जुलै रोजी रेड अलर्ट तर ३० जुलै रोजी ऑरेंज अलर्ट जारी...

उद्यापासून राज्याच्या विविध भागात वाढणार पावसाचा जोर; नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या एका कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागांत उद्या,बुधवार २९ जुलै ते ३१ जुलैदरम्यान पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज...

पुलाचा कठडा तोडून कालव्यात कोसळली कार; एकाचा जागीच मृत्यू,तर तिघेजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-मुलगा व सुनेसोबत नातवाच्या भेटीसाठी गेलेल्या एका वृद्धेची नातवाची भेट ही अखेरची ठरल्याची घटना गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा-आमगाव मार्गावरील हरदोली गावाजवळील पुलाजवळ...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!