Saturday, September 12, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली पोलीस अधीक्षक कार्यालयास राज्यस्तरीय दुसऱ्या क्रमांकाचा मान...

गडचिरोली पोलीस अधीक्षक कार्यालयास राज्यस्तरीय दुसऱ्या क्रमांकाचा मान…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा मोहिमेत गडचिरोली जिल्ह्याने आपली ठसा उमटवणारी कामगिरी सिद्ध केली आहे. या मोहिमेच्या मूल्यांकनात गडचिरोली पोलीस अधीक्षक कार्यालयाने उत्कृष्ट कार्य करत १०० पैकी ८० गुण मिळवत राज्यस्तरीय दुसऱ्या क्रमांकाचा मान मिळवला आहे.पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या नेतृत्वाखाली गडचिरोली पोलीस दलाने तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर,नागरिकांच्या सेवा सुलभतेसाठी उचललेली पावले तसेच कार्यालयीन पारदर्शकता आणि कार्यक्षमतेत लक्षणीय सुधारणा केल्यामुळे सदरचा बहुमान मिळाला आहे.
भारतीय गुणवत्ता परिषदेच्या मूल्यांकनात एकूण दहा निकषांवर कार्यालयांची तपासणी करण्यात आली. त्यात कार्यालयीन सोयीसुविधा,तक्रार निवारण यंत्रणा, वेबसाईट कार्यक्षमता,गुंतवणूक अनुकूलता, नागरिकाभिमुख सेवा अशा विविध बाबींचा समावेश होता.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व विजेत्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.त्यांनी म्हटले की, “ही गुणवत्ता मोहिम केवळ सुरुवात आहे.ही एक चळवळ होऊन नागरिकांना उत्तम सेवा देणारे सक्षम प्रशासन घडवण्याचे उद्दिष्ट आहे.”
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सासऱ्याने केला सुनेचा खून अन् स्वतःच मारली विहिरीत उडी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या यशोधरानगर पोलिस ठाणे हद्दीच्या पिवळी नदी परिसरातील पाहुणे ले-आऊटमध्ये एक खळबळ उडवणारी घटना आज,शनिवार १२ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस...

राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता; दोन दिवस पावसाचे..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.पुढील दोन दिवस राज्यातील विविध भागात पावसाची तीव्रता कायम राहणार...

नोकरीचे खोटे नियुक्तीपत्र दाखवून दोन महिलांची फसवणूक; दोघांवर गुन्हे दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-मंत्रालयात चांगली ओळख असल्याची बतावणी करून सरकारी रुग्णालयात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत दोन महिलांची तब्बल १३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा...

आता ग्रामपंचायतींचा प्रशासकीय कारभार विस्तार अधिकाऱ्यांकडे; विस्तार अधिकारी बनले प्रशासक..

उद्रेक न्युज वृत्त :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार सुरळीत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!