Friday, October 16, 2026
Homeकोरचीकोरची शहरातील डांबरी रस्त्याची लागली वाट- सबंधित विभाग गेला निद्रावस्थेत

कोरची शहरातील डांबरी रस्त्याची लागली वाट- सबंधित विभाग गेला निद्रावस्थेत

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

कोरची :- गडचिरोलीजिल्ह्यातील कोरची शहरातील तहसिल मुख्यालयाकडे जाणाऱ्या  २०० ते ३०० मीटर डांबरी रस्त्याची पुरती वाट लागली असल्याने सर्वसामान्य नागरिक,दुचाकीस्वार,चारचाकी वाहन व इतर वाहनधारकांना कमालीचा त्रास व वाहन चालवितांना तारेवरची कसरत करावी लागत असूनही याकडे संबंधित विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे स्पष्ट चित्र निर्माण झाले आहे. 

कोरची तालुका अतिदुर्गम,नक्षलग्रस्त व मागासवर्गीयांचा तालुका म्हणून गणला जातो. तालुक्यात अनेक शासकीय कार्यालये असून यातील अनेक अधिकारी,कर्मचारी वर्ग मुख्यालयी राहत नसल्याने अनेक समस्यांच्या विळख्यात कोरची शहर व ग्रामीण भाग सापडला आहे.अशातच थातूरमातूर कामांची भर पडल्याने कंत्रादारांची चांदी तर सर्वसामान्य नागरिकांची वांदी; असे चित्र निर्माण झाले आहे.त्यामुळेच ‘एक ना धड भाराभर चिंध्या’ होत असूनही संबंधित विभागाचे अधिकारी,कर्मचारी निद्रावस्थेत गेले की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

लाखोंचे काम केले जाते; मात्र काही कालावधीतच पुरती वाट लागत असल्याने रस्ता की खड्डा,पैश्याचा अड्डा असे म्हणणे वावगे ठरणार नाही.यासाठी दुर्लक्ष न करता वा तात्पुरती मलमपट्टी न करता उखडलेला डांबरी रस्ता तात्काळ दुरुस्त करावा; अशी मागणी कोरची शहर वासियांनी केली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देसाईगंजच्या आदर्श महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी रोजगाराभिमुख मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-विद्यार्थ्यांना पारंपरिक शिक्षणासोबतच व्यावसायिक ज्ञान,कौशल्ये आणि स्वयंरोजगाराच्या संधींची माहिती मिळावी,या उद्देशाने आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देसाईगंज येथील वाणिज्य व व्यवस्थापन विभागांतर्गत...

आता तीन कल्याणकारी योजनांना इंदिरा गांधींच्या नावाऐवजी ‘प्रधानमंत्री’ शब्द..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतीच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली.या पार पडलेल्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने तीन कल्याणकारी योजनांची नावे...

गडचिरोली जिल्ह्यातील ९६ रेतीघाटांचे होणार लिलाव; सूचना व हरकती सादर करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील वाळू व रेती उत्खननासाठी योग्य स्थळांचा समावेश असलेला सन २०२६-२७ चा प्रारूप जिल्हा सर्वेक्षण अहवाल नागरिकांच्या अवलोकनासाठी www.gadchiroli.gov.in या संकेतस्थळावर...

कारची सायकलला जोरदार धडक; सायकलस्वाराचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-रात्रीच्या सुमारास सायकलने घरी परतणाऱ्या एका शेतकऱ्याला भरधाव कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात सायकलस्वार शेतकऱ्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला,तर धडकेनंतर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!