उद्रेक न्युज वृत्त
कोंढाळा(देसाईगंज):-कुणाशीही बोलतांना चेहऱ्यावर नेहमी स्मित हास्य असणारे,हसमुख चेहरा, कितीही दुःख असले तरीही स्वतः पचविण्याची क्षमता बाळगणारे,आनंदात आणि उत्साहात सर्वांची जोमाने कामे करणारे,गावातील तरुणांना रोजगार देणारे, सामाजिक, राजकीय व इतर क्षेत्रात दांडगा अनुभव असणारे,ऑल वेज पॉझिटिव्ह विचाराचे असे व्यक्तिमत्व असणारे गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा येथील निवासी माजी पंचायत समिती उपसभापती तथा देसाईगंज तालुका कोंग्रस कमिटीचे तालुका उपाध्यक्ष नितीन राऊत यांचा ४५ वा वाढदिवस आज,गुरुवार दिनांक-२५ जुलै ला आरमोरी विधानसभा क्षेत्राचे काँग्रेस नेते तथा शेतकरी नेते रामदास मसराम व मित्र परिवार यांच्या तर्फे कोंढाळा गावामध्ये मोठ्या थाटात तसेच उत्साहात साजरा करण्यात आला.

नितीन राऊत यांच्या ४५ व्या वाढदिवस दिनाचे औचित्य साधून काँग्रेस नेते रामदास मसराम व मित्र परिवार यांच्या तर्फे उत्कृष्ट असे नियोजन करण्यात आले.गावातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेमध्ये वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रसंगी काँग्रेस नेते रामदास मसराम म्हणाले की,नितीन राऊत यांचा ४५ वा वाढदिवस शालेय विद्यार्थी,गावातील प्रतिष्ठित नागरिक,गावकरी मंडळी यांच्या सोबत साजरा करीत असतांना मोठा आनंद होत आहे.नेहमी हसमुख व ऑल वेज पॉझिटिव्ह विचार मनात बाळगणारे राऊत यांना वाढदिवस दिनी उदंड आयुष्य लाभो; अशा शुभेच्छा देऊन शालेय विद्यार्थ्यांनी भरपूर अभ्यास करावा; शंभर मित्रांपैकी जीवनात पाच च मित्र चांगले विचाराचे असावे.वाईटाच्या संगतीने जाऊ नये; शिक्षणाशिवाय पर्याय नाही.चांगले,वाईट व इतर घडामोडींना आकार देण्याचे काम हे केवळ शिक्षणच करीत असते.त्यासाठी सर्वांनी शिक्षण घेणे आवश्यक आहे; यावेळी मार्गदर्शनपर विचारातून मसराम बोलत होते.

कार्यक्रमा नंतर केक कापून राऊत यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.त्यानंतर काँग्रेस नेते रामदास मसराम यांच्या वतीने जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील संपूर्ण ३२५ शालेय विद्यार्थ्यांना मोफत नोटबुक व बिस्कीटचे वाटप करून शालेय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.त्यानंतर गावातीलच विद्या निकेतन संकुल लोकमान्य टिळक विद्यालयातील १४० विद्यार्थ्यांना कार्यक्रमाचे आयोजन करून मोफत नोटबुक आणि बिस्किटे वाटप करण्यात आली. गावातील पानठेलेधारक नागरिकांना घड्याळ तसेच गावातील नागरिकांना टी-शर्ट,त्याचप्रमाणे थैले वाटप करण्यात आले.रामदास मसराम यांनी गोर गरीब जनतेची कळकळ लक्षात घेता आरमोरी विधानसभा क्षेत्रात एकूण सात आरोग्य मेळावे आयोजित केली आहेत.त्याचबरोबर आता संपूर्ण आरमोरी विधानसभा क्षेत्रातील जिल्हा परिषद शाळा तसेच खाजगी शाळेतील शालेय विद्यार्थ्यांना जवळपास २५ हजाराच्यावर मोफत नोटबुकचे वितरण करण्यात येणार आहे.

नितीन राऊत यांच्या वाढदिवस दिनी,आरमोरी विधानसभा क्षेत्राचे काँग्रेस नेते रामदास मसराम, माजी पंचायत समिती सभापती परसराम टिकले, गावच्या प्रथम नागरिक सरपंचा अपर्णा राऊत, तंटामुक्ती समिती अध्यक्ष हरिभाऊ पत्रे,देसाईगंज ओबीसी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कैलास वानखेडे, देसाईगंज युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष विजय पिल्लेवान,ग्रामपंचायत सदस्य संदीप वाघाडे, सामाजिक कार्यकर्ते अरुण कुंभलवार,सीताराम धोटे,बाबुराव राऊत,जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक योगेश ढोरे,विद्या निकेतन विद्यालयाचे मुख्याध्यापक देशमुख,शिक्षक टेंभुर्णे,हर्षे, हितेश तुपट,निलेश दुपारे,अक्षय राऊत,जयंत दुपारे तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यशस्वितेसाठी सागर वाढई,गौरव शीलार,जितू चौधरी,स्वप्नील मीसार,आकाश पेटकुले तथा मित्र परिवार यांनी सहकार्य केले.

