उद्रेक न्युज वृत्त
मुख्य संपादक/सत्यवान रामटेके
देसाईगंज(गडचिरोली) :- देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा मेंढा घाटावर देसाईगंज महसूल प्रशासनाच्या वतीने खड्डा मारून काही काळ अवैध रेती चोरट्यांवर आळा घातला होता.मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून रेती तस्करांनी रेती घाटावर कुणीही लक्ष घालीत नसल्याचे निदर्शनास येताच; कोंढाळा मेंढा घाटावर भला मोठा मारलेल्या खड्ड्याची वाट लावून अवैध रेती तस्करीस आणखी व तितक्याच जोमाने रेती चोरींचे प्रमाण अधिक वाढले आहे.अशातच पिंपळगाव वैनगंगा नदी घाटातून रेती तस्करी करण्यासाठी दीड किलोमिटर अंतरावर मुरूम टाकून तसेच मार्गाचा रपटा तयार करून अवैध रेती तस्करी केली जात असूनही यावर आळा घालण्यास देसाईगंज महसूल प्रशासन कुचकामी झाल्याचे दिसून येत आहे.
त्यामुळेच कुठलाही व्यक्ती वा कंत्राटदार रेती घाट लिलाव जरी होत असेल तरीही घाट घेण्यास पुढाकार घेऊच शकणार नाही? कारण अगोदरच रेती चोरट्यांनी रेती घाटांची वाट लावली आहे.त्यामुळे रेतीचा डेपो कोण घेणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

