- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
कोंढाळा(गडचिरोली):-रयतेचे राजे शिव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंती दिनाचे औचित्य साधून आज,गुरुवार १९ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा ग्रामपंचायत पदाधिकारी तथा उपस्थित मान्यवरांच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात संपन्न झाली.प्रसंगी ग्रामपंचायतीच्या सरपंचा अपर्णा नितीन राऊत,उपसरपंच गजानन सेलोट,पोलीस पाटील किरण कुंभलवार,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष हरिभाऊ पत्रे,शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष पवन खोब्रागडे,ग्रामपंचायतीचे सदस्य शेषराव नागमोती, ग्राम रोजगार सेवक प्रकाश बेदरे, प्रतिष्ठित नागरिक निखिल गोरे,संपूर्ण अंगणवाडी सेविका,मदतनीस,ग्रामपंचायत कर्मचारी प्रदीप तुपट, अजय भर्रे तथा ग्रामस्थ उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेसमोर दीपप्रज्वलन करुन अगरबत्ती व पुष्पहार अर्पण करुन शिवाजी महाराजांचा जयघोष करण्यात आला.त्यानंतर,शिवाजी महाराजांच्या जीवन गाथेवर प्रकाश टाकून जयंती दिनाचे महत्व पटवून देण्यात आले.
- Advertisement -

