Wednesday, September 2, 2026
Homeगोंदियाकॉलेजसाठी निघालेल्या दोन तर स्टेशनरी खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडलेली एक; तीन अल्पवयीन...

कॉलेजसाठी निघालेल्या दोन तर स्टेशनरी खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडलेली एक; तीन अल्पवयीन मुली घरी परतल्याच नाही..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-अल्पवयीन मुली घरून पलायन होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढलेले दिसून येत आहे. अनेकांवर प्रेमाचे भूत सवारलेले दिसते.नाहीतर घरी सर्वकाही बरोबर असतांना काबाळकष्ट करणाऱ्या आई-वडिलांना सोडून असे कुणीही जात नसतो. काहीजण वय नसतांनाही स्वमर्जिने घर सोडतात आणि इतरांना त्याचे परिणाम भोगावे लागतात.अश्याच प्रकारे गोंदिया शहर व तिरोडा तालुक्यातील मुली घरी न परतल्याने कुटूंबीय चिंतातुर होऊन पोलीस ठाण्यात धाव घ्यावी लागल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.कॉलेजसाठी निघालेल्या दोन तर स्टेशनरी खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडलेली एक,अश्या तीन अल्पवयीन मुली गायब झाल्या आहेत.गोंदिया शहरातील कुंभारेनगर परिसरातील १७ वर्षीय मुलगी शनिवारी सकाळी १० वाजता दरम्यान स्टेशनरी खरेदीसाठी घराबाहेर पडली,मात्र परतली नसल्याने तिला अज्ञात व्यक्तीने आमिष देऊन पळवून नेल्याचा संशय आहे.अश्याच प्रकारे तिरोडा तालुक्यातील ग्राम बोदा येथील १४ वर्षीय मुलगी शुक्रवारी पहाटे ६ वाजता तुमसर येथे परीक्षा आहे,असे सांगून घरातून निघाली.मात्र सायंकाळपर्यंत घरी परतली नाही.तिचा मोबाइल बंद असून,तिला अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याची तक्रार पालकांनी केली आहे.अश्याच प्रकारे लगतच्या ग्राम नंगपूरा मुर्ती येथील १६ वर्षीय मुलगी शनिवारी सकाळी ८.३० वाजता कॉलेजसाठी घरून निघाली मात्र बराच कालावधी ती घरीच परतली नाही.तिन्ही घटनांसंदर्भात संबंधित पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १३७ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जागतिक नारळ दिन विशेष..! नारळ लागवड; शाश्वत उत्पन्नाचा ‘कल्पवृक्ष’..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आज बुधवार २ सप्टेंबर दरवर्षी २ सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक नारळ दिन’ म्हणून साजरा केला जातो. नारळाच्या झाडाचा जवळपास प्रत्येक भाग उपयोगात...

धक्कादायक..! जेवणाच्या डाळभाजीत पाल; ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डाळभाजीत पाल (विचगुर)पडल्याने तब्बल ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे जाणवू लागल्याची घटना आज,मंगळवार १ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या...

अनाथ बालकांना योजनांचा लाभ वेळेत देण्याचे जिल्ह्याधिकाऱ्यांचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात महिला व बालकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांपर्यंत त्यांचा लाभ वेळेत पोहोचवावा.बालविवाह व अल्पवयीन मातांशी...

आजपासून बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांसाठी ‘एनसीएमसी’ कार्ड अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या विविध सवलतधारक प्रवाशांसाठी आज,मंगळवार १ सप्टेंबर पासून 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' म्हणजेच संपर्करहित स्मार्ट कार्ड (एनसीएमसी)अनिवार्य करण्यात आले...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!