Sunday, May 3, 2026
Homeगडचिरोलीकुरखेडा तालुक्यातील जांभूळखेडा हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार नक्षलवादी अटकेत..

कुरखेडा तालुक्यातील जांभूळखेडा हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार नक्षलवादी अटकेत..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्याच्या भामरागड उपविभागांतर्गत येणाऱ्या कवंडे पोलीस स्टेशन हद्दीतील जंगल परिसरात घातपात करण्याच्या दृष्टीने रेकी करणाऱ्या एका जहाल नक्षलीस गडचिरोली पोलिसांचे विशेष पथक व केंद्रीय राखीव दलाच्या ३७ बटालियनने संयुक्त कारवाई करीत अटक केली आहे.विशेष म्हणजे,अटक करण्यात आलेला जहाल नक्षली उपकमांडर रँकचा असून १ मे २०१९ रोजी कुरखेडा तालुक्याच्या जांभूळखेडा जंगल परिसरात झालेल्या भूसुरुंग स्फोटातील कटकारस्थानात प्रमुख सूत्रधार असल्याचे समोर आले आहे.स्फोटात गडचिरोली पोलीस दलाचे १५ जवान शहीद झाले होते.अंकल ऊर्फ मन्नू सुलगे पल्लो वय २८ वर्षे,रा.कवंडे,ता. भामरागड,जि.गडचिरोली असे अटकेतील नक्षलवाद्याचे नाव आहे.२९ मार्च २०२१ रोजी खोब्रामेढा जंगल परिसरात झालेल्या चकमकीवरून  त्याचे नाव समोर आले होते.यापूर्वी त्याच्यावर पुराडा पोलीस ठाण्यात अप.क्र.११/२०२१ अंतर्गत चकमक व खूनाचे असे पाच गुन्हे दाखल आहेत.२०१७ ते २०२० पर्यंत कोरची दलममध्ये उपकमांडर पदावर कार्यरत होता.अंकल पल्लोवर शासनाने सहा लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.पुढील तपासाकरिता त्यास कुरखेडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असता आज,शनिवार २८ जून रोजी कुरखेडा न्यायालयाने ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अचानकपणे रानडुकरांचा कळप मार्गावर आला; धाडकन दोन दुचाक्या धडकल्या.. – तिघेजण गंभीर जखमी,तर एकजण किरकोळ जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-दुचाकीने निघालेल्या गावापासून काही अंतरावरील मार्गावर अचानकपणे रानडुकरांचा कळप आडवा आल्याने झालेल्या अपघातात तिघेजण गंभीर जखमी झाले,तर एकजण किरकोळ जखमी झाल्याची...

सौर विद्युत कुंपण योजना ही शेतकऱ्यांच्या हिताचीच; उधळपट्टीचे आरोप निराधार- कृषी विभागाचे स्पष्टीकरण

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधीतून राबविण्यात येत असलेल्या सौर विद्युत कुंपण योजनेबाबत प्रसिद्ध झालेल्या बातम्यांतील आरोप वस्तुस्थितीला धरून नसून दिशाभूल करणारे आहेत.ही...

कोंढाळा येथे दोन दिवसांपासून बिबट्याची दहशत; दोन शेळ्यांचा पाडला फडशा..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):-गेल्या दोन दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घालत एकाच दिवशी दोन शेळ्यांचा फडशा पाडून दहशत माजवली आहे.बिबट्या एवढ्यावरच थांबला नाही,तर परत दुसऱ्या दिवशीही शिकारीच्या...

लाडक्या बहिणींना मोठा झटका; लाखो महिला अपात्र..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील अनेक कुटुंबांसाठी आधार देणारी व महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना देणारी महाराष्ट्र राज्यातील महायुती सरकारने जुलै-२०२४ पासून सुरू केलेली 'मुख्यमंत्री-माझी लाडकी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!