- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने सामाजिक बांधिलकी जोपासत
नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा व जुनी वडसा येथील शालेय विद्यार्थ्यांना मोफत नोटबुकचे वितरण करून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी जागृती निर्माण करण्यात आली.प्रसंगी देसाईगंज काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र बुल्ले म्हणाले की,विद्यार्थ्यांनी शिक्षणाची कास धरावी.समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी शिक्षण हा सर्वात प्रभावी मार्ग आहे.हा उपक्रम म्हणजे केवळ नोट बुकांचे वाटप नाही,तर विद्यार्थ्यांचे उज्वल भविष्याची शिदोरी देण्याचा प्रयत्न होता.नोटबुक मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर काहीकाळ आनंद फुलून आले.नोटबुकचे वितरण करतेवेळी शाळेचे मुख्याध्यापक चौहान,ओबीसी काँग्रेस तालुकाध्यक्ष कैलाश वानखेडे,युवक काँग्रेस शहराध्यक्ष विजय पिल्लेवान,हाके,पठाण,पटले,अनिल मुळे सह शाळेचे शिक्षकवृंद उपस्थित होते.
- Advertisement -

