Thursday, September 10, 2026
Homeगडचिरोलीकिलोमीटरचे अंतर दर्शविणाऱ्या दगडाला दुचाकीची धडक; २५ वर्षीय तरुण जागीच ठार तर...

किलोमीटरचे अंतर दर्शविणाऱ्या दगडाला दुचाकीची धडक; २५ वर्षीय तरुण जागीच ठार तर दोघे तरुण गंभीर जखमी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-चंद्रपूर जिल्ह्याच्या पोंभूर्णा तालुक्यातील दोघे व मूल तालुक्यातील एक असे तिघे तरुण गडचिरोली जिल्ह्याच्या मुलचेरा येथे काही कामानिमित्त जात असतांनाच वाटेतील आष्टी ते मुलचेरा मार्गावरील रेंगेवाही पुलाजवळ दुचाकी अनियंत्रित होऊन किलोमीटरचे अंतर दर्शविणाऱ्या दगडाला जाऊन धडकली.धडक इतकी भीषण होती की,यात २५ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला,तर दोघे तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना आज,सोमवार २५ ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली.लकी उर्फ लखन गोरडवार वय २५ वर्षे,रा.नांदगाव (घोसरी) ता.पोंभुर्णा,जि.चंद्रपूर असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे.तर अक्षय वाकुडकर वय २५ वर्षे,रा.नांदगाव(घोसरी)ता.पोंभुर्णा,जि.चंद्रपूर व शुभम वाकुडकर वय २४ वर्षे रा.बोंडाळा,ता.मुल,जि.चंद्रपूर असे अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणांची नावे आहेत.
तिघेही तरुण आज सोमवारी चंद्रपूर जिल्ह्याच्या पोंभूर्णा तालुक्यातील नांदगाव(घोसरी)येथून एमएच ३४ बीडब्लू ४९०९ क्रमांकाच्या दुचाकीने गडचिरोली जिल्ह्याच्या मुलचेरा येथे काही कामानिमित्ताने जाण्यासाठी निघाले होते.अश्यातच मुलचेरा येथे जात असतांनाच सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान आष्टी मुलचेरा मार्गावरील रेंगेवाही पुलाजवळ जाताच अचानकपणे दुचाकी अनियंत्रित झाल्याने मार्गावरील किलोमीटरचे अंतर दर्शविणाऱ्या दगडाला जाऊन धडकली.धडक बसताच दुचाकीस्वार लखन गोरडवार,अक्षय वाकुडकर व शुभम वाकुडकर हे दुचाकीवरून दूरवर फेकल्या गेल्या.यात लखन गोरडवार जागीच गतप्राण झाला,तर नाना वाकुडकर व शुभम वाकुडकर दोघेही गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या लक्षात येताच लगेच त्यांनी आष्टी पोलिसांना कळवले.आष्टी पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल होत जखमींना तात्काळ आष्टी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.घटनेचा पुढील तपास आष्टी पोलीस प्रशासन करीत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धरणात बुडालेल्या तरुण शेतकऱ्याचा सापडला मृतदेह..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बैल पोळा सणाच्या एक दिवसापूर्वी धरण परिसरात बैल धुण्यासाठी गेलेला तरुण शेतकरी बुडाल्याची घटना काल,बुधवार ९ सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजेच्या...

सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन,वारसा हक्क,पदोन्नती व निवासाच्या प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करा- राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागरिकांचे आरोग्य आणि सार्वजनिक स्वच्छता राखण्यात सफाई कर्मचाऱ्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे.त्यामुळे त्यांच्या वेतन,सेवा,आरोग्य, निवास व आर्थिक सुरक्षिततेशी संबंधित प्रलंबित प्रश्नांचा...

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत विद्यार्थ्यांमध्ये उत्तम मूल्यसंस्कार रुजविणे काळाची गरज-शिक्षणमंत्री दादाजी भुसे – ‘चला शाळेत जाऊया’ अभियानांतर्गत आज विविध शाळांना प्रत्यक्ष भेटी.. – पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शाळेत केवळ पुस्तकी ज्ञान देणे पुरेसे नसून गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच भावी पिढीवर राष्ट्रभक्तीचे आणि उत्तम मूल्यांचे संस्कार रुजवणे गरजेचे आहे.गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातही...

अजब लाचेची गजब कहाणी..! दोन्ही हातांच्या दहा बोटांचा इशारा करून मागितली १० हजाराची लाच.. – पोलीस उपनिरीक्षक व पोलीस अंमलदार एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  छत्रपती संभाजीनगर :-राज्याच्या विविध भागात सरळ-सरळ तोंडी बोलणी करून अनेकजण लाच घेतांना व एसीबीच्या जाळ्यात अडकतांना दिसून येतात.पण, नुकतेच छत्रपती संभाजीनगर(पूर्वीचे औरंगाबाद)शहरात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!